शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृध्दी अभियानाचा शुभारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 15:06 IST

स्व. भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृद्धी अभियानाचा शुभारंभ शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे ८ सप्टेंबर रोजी झाला.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी २ हजार फळवर्गीय रोपट्यांचे वितरण करण्यात आले.  शेगांव तालुक्यात  १२ सप्टेंबर पर्यंत फळझाड वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

खामगाव : भाऊसाहेबांना शेतकºयांविषयी विशेष प्रेम व आदर होता. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवूनच स्व. भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृद्धी अभियान राबवले जात आहे. आत्महत्याग्रस्त तणाव ग्रस्त, अल्पभूधारक शेतकºयांना अभियानात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. लिंबू, पेरु  व जांभूळ असे तीन रोपटे पाच हजार शेतकºयांना वितरीत केले जाणार आहेत. फळझाडा पासून कायम स्वरूपी उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे वाटण्यात आलेले झाड हे भाऊसाहेबांची स्मृती म्हणून लाभार्थी शेतकरी कुटुंबांनी जगवावे असे आवाहन भाजपा सोशल मिडीया महाराष्ट्रचे सदस्य तथा वसुंधरा बहुउददेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर फुंडकर यांनी केले. महाराष्ट्राचे माजी कृषी व फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमीत्य भारतीय जनता पार्टी खामगांव मतदार संघ व वसुंधरा बहुउददेशीय सामाजिक संस्था खामगावच्यावतीने आयोजीत स्व. भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृद्धी अभियानाचा शुभारंभ शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे ८  सप्टेंबर रोजी झाला. पहिल्याच दिवशी २ हजार फळवर्गीय रोपट्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खामगांव मतदार संघातील आत्महत्याग्रस्त, तनावग्रस्त व अल्पभुधारक शेतकरी यांना फळझाड वाटप करण्याच्या लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृध्दी अभियानास पहूरजीरा गावापासून सुरुवात झाली. भाजपा सोशल मिडीया महाराष्ट्रचे सदस्य तथा वसुंधरा बहुउददेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर फुंडकर यांनी शेतकºयांना फळवर्गीय रोपट्यांचे वितरण केले. या कार्यक्रमाला जि.प.सदस्या सौ स्वातीताई  देवचे, कृषी उत्पन्न बाजार सभापती गोविंदराव मिरगे, जिल्हा सरचिटणीस संतोषराव देशमुख, जिल्हा महिला आघाडीच्या  अनिताताई देशपांडे तालुकाध्यक्ष राजेंद्र देवचे, खामगांव तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, तालुका सरचिटणीस  एकनाथ पाटील, माणिक भाऊ लाड,आदितीताई  गोडबोले, पांडुरंग सावरकर, प्रमोद वडोदे   यांची प्रमुख उपस्थिती होती.  शेगांव तालुक्यात  १२ सप्टेंबर पर्यंत फळझाड वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  त्यानंतर खामगांव तालुक्यात १४ सप्टेंबर पासून सुरुवात होईल. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरShegaonशेगाव