शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

 बुलडाणा जिल्हयाच्या चेकपोस्टवर पोलिसांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 10:31 IST

जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील चेकपोस्टला छेद देवून अनेक जणांचा प्रवास अजूनही सुरुच असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रविवारी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले. अन रात्री उशिरा जळगाव जामोद येथे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्याने जिल्हावासियांनी पुन्हा एकदा धसका घेतला आहे. बुलडाणा जिल्हयात व जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील चेकपोस्टला छेद देवून अनेक जणांचा प्रवास अजूनही सुरुच असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.‘लोकमत’ने दोन दिवसापूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील सिमेवरील चेकपोस्ट नावापुरत्याच असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष. जिल्ह्याला लागून अकोला, जळगाव, व बºहाणपूर, जालना हे चार जिल्हे लागतात. राज्यात लॉकडाउन सुरु होवून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. जळगाव खांदेश, बºहाणपूर, जालना व अकोला हे चारही जिल्हे रेडझोन मध्ये असताना या जिल्ह्यातून बुलडाणामार्गे सर्रास नागरिकांची ये-जा सुरु आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या सिमेवर चेकपोस्ट तयार करण्यात येवून त्याठिकाणी तपासणीशिवाय कुणालाही एन्ट्री देण्यात येवू नये असे स्पष्ट निर्देश असताना त्यांच्या आदेशाला मात्र पोलिसांकडून तिलांजली दिली जात असल्याचे दिसून आले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी अधिकृत परवानगीची अट असताना सर्रासपणे या आदेशाचे उल्लंघन होतांना दिसत आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढल्याचे दिसून येते. आज जळगाव जामोद येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घटनेने याप्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे. अकोला येथे रुग्णालयीन कामानिमित्त, बºहाणपूर, इंदौर, जळगाव खांदेश येथे साहित्य खरेदीसाठी सर्रासपणे आजही नागरिक जातांना दिसत आहेत. विशेष म्हणजे जिल्हयाच्या सिमेवर प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. पोलिसांची नजर चुकवून रेडझोन मधील जिल्ह्यात ये जा करणे नागरिकांना कशाप्रकारे महागात पडू शकते याचा प्रत्यय आलाच आहे. आतातरी पोलिस प्रशासनाने चेकपोस्टवर काटेकोर तपासणी करण्याची गरज आहे.चेकपोस्टवरील पोलिसांच्या कर्तव्याबाबत शंकाजळगाव जामोद येथील तिघे अंत्यसंस्कारासाठी बºहाणपूरला गेले अन परत आले, ते कोरोना घेवूनच. तिघांपैकी एकाची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या घटनेने चेकपोस्टवरील तपासणीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव