शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात सिंचनाचा अभाव; रब्बीचा पेरा घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:04 IST

अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्‍यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्‍यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे.  

ठळक मुद्देगत वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्‍यात २६ हजार ८२६ हेक्टरने झाली घट 

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्‍यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्‍यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या वर्षी १ लाख ४५ हजार ९९0 हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली होती. यामध्ये हरभरा पिकाचा पेरा सर्वाधिक होता. दरम्यान, यावर्षी हरभरा पिकाचा पेरा अधिक असला तरी, जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रफळात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाला मिळणारा भाव यामुळे रब्बीच्या पेर्‍यात घट झाल्याचे दिसून येते. उत्पादन खर्चापेक्षाही उत्पन्न कमी होत असल्याने, काही शेतकर्‍यांनी रब्बी पिकाची पेरणी टाळली आहे. त्याचवेळी  जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती बटाईने दिल्याचीही वस्तुस्थिती आहे. सन २0१४-१५ आणि २0१५-१६च्या तुलनेत समाधानकारक पावसामुळे  गेल्या वर्षी म्हणजेच सन २0१६-१७ मध्ये रब्बीच्या पेर्‍यात लक्षणीय वाढ झाली होती; परंतु यावर्षी पावसाची अनियमिता, उत्पादनातील तूट आणि शासनाच्या धोरणामुळे रब्बी क्षेत्रात घट झाल्याची ग्रामीण भागात चर्चा आहे. तथापि, जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा रब्बीच्या पेर्‍यात लक्षणीय वाढ असल्याचे दिसून येते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात  ७४ टक्यांची वाढ असून, चिखली तालुक्यात २ टक्यांची वाढ दिसून येते. त्याचवेळी सिंदखेड राजामध्ये सरासरी क्षेत्रापेक्षा ३१ टक्के अधिक रब्बीचा पेरा झाला आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा कमी पेरा शेगाव (२४), जळगाव जामोद (३२), मोताळा (३६) आणि नांदुरा (३४) टक्के झाला आहे. तथापि, घाटाखालील तालुक्यांच्या तुलनेत घाटावरील तालुक्यांमध्येच रब्बीचा पेरा अधिक झाल्याचे दिसून येते. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांची निगा राखणे गरजेचे आहे. - 

टॅग्स :agricultureशेतीBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय