शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी उद्योगधंदे अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:57 IST

येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५० टक्के उपकरणे हे निकामी झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे गावातील अनेक विद्यूत उपकरणे निकामी झाली आहेत. धड खेड्यात नाही आणि धड शहरातही नाही अशी अवस्था साखरखेर्डावासियांची झाली आहे. विज पुरवठा सुरळीत नसल्याने छोटे - मोठे उद्योग आपली बासने गुंडाळून सुविधा असलेल्या ठिकाणी बस्तान मांडीत आहेत.सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून साखरखेर्डा या गावाची ओळख आहे . परंतू आजही काही बाबतीत या गावात पाहीजे त्या सुविधा मिळत नाही. त्यामुळे अनेक व्यवसाय शहरात जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी विज वितरण कंपनीने येथे अद्ययावत उपकरणे बसवून विज पुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे. साखरखेर्डा या गावची लोकसंख्या १८ हजार असून परिसरातील शिंदी , पिंपळगाव सोनारा , राताळी , मोहाडी , सवडद , माळखेड , गुंज , सावंगीभगत , गोरेगाव , उमनगाव , काटेपांग्री , वडगावमाळी , सायाळा , बाळसमुद्र , तांदुळवाडी, दरेगाव येथे साखरखेर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरुन विज पुरवठा केला जातो.येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५० टक्के उपकरणे हे निकामी झाली आहेत. उपकेंद्रात साखरखेर्डा गाव फिडर , शेंदुर्जन गाव फिडर , आणि इतर गावांचे फिडर हे वेगवेगळे होते . मागील तीन वर्षात एक- एक फिडर बंद होत आहे. सर्व लोड हा साखरखेर्डा फिडरवर टाकला आहे .शेतीचा विज पुरवठा करतांना ग्रामीण भागात भारनियमन करुन विज पुरवठा केला जातो. त्यावेळी साखरखेर्डा गावातील विज ही कमी दाबावर असते. गेल्या आठवडाभरापासून विज गूल होत असताना त्याचे कारण तरी कुणाला विचारावे? असा प्रश्न निर्माण होत आहे. विजेची समस्या निर्माण झाल्याने छोटे, मोठे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. परिणामी त्यांना सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे.येथे कनिष्ठ अभियंता नाही, लाईनमन नाही, आॅपरेटर आणि काही दोन चार कर्मचाऱ्यांनाच कामे करावी लागत आहेत. त्यामुळे भविष्यात या उपकेंद्राचा डोलारा केंव्हाही बंद पडू शकतो. त्यासाठी वेळीच लक्ष देण्याची गरज झाली आहे, अशी मागणी शिवसेना जिल्हा उपप्रमूख बाबूराव मोरे , सभापती राजेश ठोके , महेंद्र पाटील, गोपालसिंग राजपूत, राकाँ. शहराध्यक्ष दत्ता घोडके, सुजित महाजन , युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, संदिप सोनुने यांनी केली आहे .

विज वितरण कंपणीने वेळीच दखल घेतली नाही तर विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.- महेंद्र पाटीलसाखरखेर्डा

तालुक्यात मी एकटाच कनिष्ठ अभियंता आहे. सर्व ठिकाणचा पसारा पाहणे कठीण आहे. साखरखेर्डा गावातील विजपुरवठा सुरळीत करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे.- भुषण देवरेप्रभारी कनिष्ठ अभियंतामहावितरण, साखरखेर्डा

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण