आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली कोविड प्रतिबंधात्मक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:01+5:302021-01-17T04:30:01+5:30

चिखली उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीला पार पडले. या अगोदरही मानवावर अनेक संकटे आली; परंतु मानवाने त्या ...

Kovid preventive vaccine was given to health workers | आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली कोविड प्रतिबंधात्मक लस

आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली कोविड प्रतिबंधात्मक लस

googlenewsNext

चिखली उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीला पार पडले. या अगोदरही मानवावर अनेक संकटे आली; परंतु मानवाने त्या सर्व संकटांवर मात केलेली आहे. कोरोनावरही मानव मात करणार हे निश्चित होते. त्यात भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंध करणारी लस शोधून काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लस सर्व भारतीयांसाठी मोफत उपलब्ध करून दिली. भारतातील निर्मित लस जगभरात जाणार असल्याने जगाचा प्रवास आता कोरोना मुक्तीकडे होणार असून सर्वांनी लस घेण्याचे आवाहन आ. श्वेता महाले यांनी यावेळी केले. आरोग्य, पोलीस, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि इतर योद्धांचे जिवावर उदार होऊन काम केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, पं. स. सभापती सिंधू तायडे, भाजपा उपजिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. टी. खान, तहसीलदार अजितकुमार येळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इम्रान खान, पो. नि. दवणे, जि. प. सदस्या सुनंदा शिनगारे, पं. स. सदस्या मनीषा सपकाळ, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य नामु गुरुदासानी, बबनराव राऊत, अनुप महाजन, प्रा. डॉ. राजू गवई, विजय नकवाल, शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, सुभाषअप्पा झगडे, कुणाल बोंद्रे, दिलीप डागा, सिद्धेश्वर ठेंग, विजय खरे, सुरेश इंगळे, विक्की शिनगारे, डॉ. चंद्रशेखर धनवे, डॉ. मनीषा बकाल, अनिल मोरे, सुशील वाघ, मिलिंद वाघ, सुधाकर जगताप, डॉ. प्राची तनपुरे, डॉ. आरिफ बेग, डॉ. प्रदीप मेहेत्रे, डॉ. फारुख शेख, डॉ. प्रशांत मेहेत्रे, डॉ. रश्मी पाटील, डॉ. प्रतीक्षा वायाळ, राहुल वाघमारे, अमोल मेहेत्रे, विजय डुकरे, प्रभाकर डुकरे, अधिपरिचारिका गीता सुरडकर, सुरेखा म्हस्के, गणेश पठाडे यांच्यासह आशा वर्कर व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते. अनिल मोरे व जाधव यांना कोविड लस देण्यात आली.

Web Title: Kovid preventive vaccine was given to health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.