बुलडाणा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. यावेळी कोणतीही विपरित घटना घडू नये म्हणून शहरातील विविध चौकात पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरात मंगळवारी उमटले. सकाळी संतप्त जमावाने विविध चौकात निषेध नोंदविला. जनता चौकासह विविध प्रतिष्ठाने, एस.टी.बसेसवर दगडफेक झाली. त्यात ३ एस.टी.बससह काही प्रतिष्ठानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी ७ तरूणांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बमंससह विविध संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजारासह कारंजा चौक, जयस्तंभ चौक, संगम चौक, त्रिशरण चौकातील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. मात्र एस.टी.बस व खाजगी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे बाहेरगावी जाणाºयांना त्रास सहन करावा लागला. बुधवारी जिल्ह्यातून एकही बस सोडण्ता आली नाही. मंगळवारच्या अनुभवानंतर राज्य परिहवन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने बसगाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानक परिसरात कोणतीही विपरित घटना घडू नये म्हणून पोलिसांच्या एका विशेष तुकडीसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:33 IST
बुलडाणा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली.
कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक
ठळक मुद्देशहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली.राज्य परिहवन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने बसगाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धाड, लोणार, चिखली, मोताळा, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेड राजासह विविध ठिकाणची दुकाने १०० टक्के बंद दिसून आली.