शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

कोराडी प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीची पडझड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 15:26 IST

प्रकल्पाच्या भिंतीवरील संरक्षण भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे.

- ओमप्रकाश देवकर लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेला कोराडी प्रकल्पाच्या भिंती झाडाझुडपांनी वेढल्या आहेत. भिंतीवरच्या संरक्षण भिंतीची पडझड झालेली आहे. या देखभाल-दुरुस्तीकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून बेजबाबदारपणा उघड होत आहे.तालुक्यातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेला कोराडी प्रकल्प परतीच्या पावसाने आॅक्टोबरच्या शेवटी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता १५.१२ दलघमी एवढी आहे. सध्या या प्रकल्पातील पाण्यावर कालव्याद्वारे ३ हजार ७०० हेक्टर एवढे सिंचन करण्यात येते. एवढेच नव्हे तर या जलाशयातून उपसा सिंचनाद्वारे ८०० हेक्टर सिंचन होऊ शकते. या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या सर्व गावांची तहान हा प्रकल्प भरल्यामुळे भागणार आहे. मात्र हा महत्त्वाचा प्रकल्प असूनही या प्रकल्पाच्या देखभाल व दुरूस्तीकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या विभागाचा बेजबाबदारपणा उघड होत आहे. या प्रकल्पाच्या भिंतीवरील संरक्षण भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे. याच प्रकल्पाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून या झाडाझुडपांनी भिंतीला तडे गेले आहेत. यामुळे या कोराडी प्रकल्पाच्या भिंतीसह संरक्षण भिंतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पामुळे शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून या प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्नकोराडी प्रकल्पाच्या भिंतीवर झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. या झाडांची मुळे भिंतीत खोलवर जात असल्याने या प्रकल्पपाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे सदर झाडे-झुडपे तोडणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच कोराडी प्रकल्पाच्या भिंतीवरील संरक्षण भिंत अनेक ठिकाणी पडलेली आहे. या भिंतीला अनेक ठिकाणी चिरा गेलेला आहेत. यामुळे कोराडी प्रकल्पाच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्ती संदर्भात सविस्तर अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात आले आहे. निधी उपलब्ध झाल्यास ही कामे प्रथम प्राधान्याने करण्यात येतील. त्यादृष्टीने प्रशासन तत्पर आहे.-एन .ए .बळी, शाखाधिकारी,सिंचन शाखा मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर