शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या विचारांत बदल घडण्यासाठी सर्व कारागृहांत होणार कीर्तनाचा गजर

By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 15, 2023 19:42 IST

मेहकरच्या श्वासानंदपीठाचा आशीर्वाद घेऊन शुभारंभ

ब्रह्मानंद जाधव,  मेहकर - बुलढाणा: गुन्हेगारांच्या विचारांत बदल घडण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी वारकरी आचारसंहिता परिषदेचे प्रवर्तक नीलेश महाराज झरेगावकर हे राज्यातल्या सर्व कारागृहात कीर्तनाचा गजर घडवणार आहेत. १५ जुलै रोजी मेहकर येथील नरसिंह संस्थानमध्ये येऊन श्वासानंद गुरुपीठाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी या उपक्रमाच्या शुभारंभासाठी प्रस्थान ठेवले.

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुले कारागृहे आणि एक महिला कारागृह अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या सर्व कारागृहांची क्षमता २५ हजार कैद्यांची असताना त्यात ४१ हजार कैदी ठेवण्यात आले आहेत. केवळ दंड देण्यामुळे ही संख्या घटणार नाही, तर विचारांत बदल झाल्यामुळेच ही संख्या घटेल. त्यासाठी त्यांचे प्रबोधन आवश्यक आहे, या विचारातून झरेगावकर महाराजांनी ही संकल्पना मांडली. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात १७ जुलै रोजी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यापूर्वी गुरुपीठाचा आशीर्वाद घेण्यासाठी ते ज्ञानमंदिरात आले होते. प्रारंभी नरसिंह संस्थानचे विश्वस्त आशिष उमाळकर यांनी त्यांचा सत्कार केला. पीठाधीश सद्गुरु ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांनी पीठस्थ देवतेच्या वतीने आशीर्वाद दिला. पितळे महाराज हे विदर्भातले जुने फडकरी आहेत. त्यामुळे उपक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी पीठस्थ देवता नृसिंह आणि संत बाळाभाऊ महाराजांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून ज्ञानमंदिरात आलो असल्याची भावना झरेगावकर महाराजांनी व्यक्त केली. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त डॉ. अभय कोठारी, गोपाल महाराज पितळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा