शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यात युवक ठार

By admin | Updated: March 22, 2016 02:30 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील घटना; पाळत ठेवून केला हल्ला; सहा आरोपींना अटक.

सिंदखेड राजा(जि. बुलडाणा) : तालुक्यातील वर्दडी बु. येथील २२ वर्षीय युवकास सहा व्यक्तींनी रात्री १0 वाजता रस्त्यात अडवून लोखंडी रॉड आणि दगडाने प्राणघातक हल्ला करुन ठार मारले. उपरोक्त घटना ही वर्दडी बु. येथे २0 मार्चच्या रात्री १0 वाजता घडली. किनगाव राजा पोलिसांनी या घटनेतील सहा आरोपींना अटक केली आहे.वर्दडी बु. येथील मृतक रामेश्‍वर अशोक शिंदे (वय २२) हा २0 मार्चला रात्री काका कांताराम शिंदे यांच्या शेतात गेला होता. शेतात जेवण केल्यानंतर रामेश्‍वर रात्री घराकडे परत येत असताना रस्त्यात त्याच्यावर पाळत ठेवून सहा युवक बसले होते. रामेश्‍वर रस्त्याने येताना दिसताच त्याला अडवून ह्यतू साळवे यांच्या मुलीसोबत का बोलतो, तिचे आणि तुझे काय संबंधह्ण असा वाद घालून त्याच्या डोक्यात, हाता-पायावर लोखंडी रॉडने व दगडाने जबर मारले. त्यातच रामेश्‍वर हा गंभीर जखमी झाल्याने रस्त्यातच बेशुद्ध अवस्थेत पडला. सकाळी शेतातून परत येणार्‍या व्यक्तींना रामेश्‍वर रक्ताच्या थारोळ्यात दिसला. त्याला तातडीने खासगी डॉक्टरांकडे आणले. तो गंभीर अवस्थेत असल्याने तातडीने जालना येथे हलविण्याचे सांगितले. किनगाव राजापर्यंत नेत असताना सकाळी ८ ते ९ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी काही नातेवाइकांना आरोपींची नावे सांगितली. मृत्युसमयी त्याने जबाब दिला. मृतकाचा चुलतभाऊ योगेश बबन शिंदे यांच्या तक्रारीवरुन किनगाव राजा पोलिसांनी आरोपी मंगेश सुरेश सोनकांबळे, स्वप्निल श्यामराव सोनकांबळे, नितीन दिलीप सोनकांबळे, विद्याधर श्यामसुंदर सोनकांबळे, हर्षद सोनकांबळे, बाळू कारभारी साळवे या सहा आरोपींना कलम ३0२, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू नागलोत करीत आहेत.