शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खामगावचा भाजी बाजार अतिक्रमणाच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:43 IST

शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख बाजारपेठा, आठवडी बाजार अतिक्रमणाने व्यापला असतानाच, आता रविवारच्या भाजी बाजारातही अतिक्रमण पोफावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील अतिक्रमण निर्मुलनासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे शहरातील विविध रस्ते आणि मैदांना अतिक्रमणाचा विळखा असतानाच, आता चक्क रविवारचा भाजी बाजारही अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटला नसल्याचे दिसून येते.खामगाव शहरातील गुरूवारी आठवडी बाजार भुसावल चौक परिसरात भरतो. तर भाजी बाजार मुख्य रस्त्यावर भरतो. दरम्यान, शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख बाजारपेठा, आठवडी बाजार अतिक्रमणाने व्यापला असतानाच, आता रविवारच्या भाजी बाजारातही अतिक्रमण पोफावत आहे. गत काही दिवसांपासून भाजी बाजारातील खुल्या जागा पक्के अतिक्रमण करून बळकाविल्या जात आहे. भंगार, कुट्टी तसेच इतर व्यवसायासाठी या ठिकाणी काही लोखंडी स्टॉल आणून ठेवल्या जाताहेत. तर काही ठिकाणी टिनाचे शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे भाजी बाजारात भाजी विक्रेते आणि ग्राहकांसाठी जागा अपुरी पडत आहे. मात्र, या अतिक्रमणाकडे नगर पालिका प्रशासनासह पोलिस प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणाला पालिकेचे अभय !पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निमुर्लनासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे नगर पालिकेच्या हद्दीतील शहर पोलिस स्टेशन रस्त्यावर गत तीन वर्षांत अतिक्रमण जागेवर मोठमोठी पक्की दुकाने थाटण्यात आली आहेत. नगर पालिका आवारालाही अतिक्रमणाचा विळखा आहे. बसस्थानक चौक, शहर पोलिस स्टेशन चौक, टॉवर चौक, जलंब रोड, नांदुरा रोडवर आणि घाटपुरी रोड, चिखली रोडवरही मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण आहे.अतिक्रमण सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. शहराच्या अनेक भागात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहे. यावरून अनेक ठिकाणी वादही होत असल्याचे दिसून येते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अतिक्रमणामुळे वाद वाढीस!अतिक्रमणाच्या जागेवरून वाढ वाढीस लागल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वीच अतिक्रमणाच्या जागेच्या वादातून घाटपुरी रोडवर दुहेरी हत्याकांड घडले. दरम्यान, बसस्थानक चौकातही दोन अतिक्रमकांमध्ये वाद उद्भवला होता. हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला होता. शहर पोलिस स्टेशनसमोरील एका अतिक्रमणावरून एकाच समाजाच्या दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला होता. सामान्य रूग्णालयासमोर अतिक्रमण माफियांचे साम्राज्य वाढीस लागले आहे. जागा मिळवून देण्यासाठी काही गल्लीदादा पुढे येताहेत. त्यामुळे आगामी काळात अतिक्रमणाच्या वादातून एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

टॅग्स :khamgaonखामगाव