शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : खामगावचा शिक्षकही ‘त्या’ मृत व्यक्तीच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:23 IST

खामगावचा शिक्षकही ‘त्या’ मृत व्यक्तीच्या संपर्कात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या खामगाव येथील एकास वैद्यकीय तपासणीसाठी बुलडाणा येथे नेण्यात आले आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील तिघांना बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. हा व्यक्ती खामगाव येथील सजनपूरी भागातील रहिवाशी असून व्यवसायाने शिक्षक असल्याचे कळते. या कारवाईनंतर खामगावातील सजनपुरी भाग सील करण्यात आला आहे.दोन दिवसापूर्वीच बुलडाणा येथील एका शिक्षकाचा कोरोना विषाणूच्या संसगार्ने मृत्यू झाला. त्याच्या दफनविधीनंतर अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला.  या घटनेनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ६५ वर्षीय वृद्धास व १४ वर्षीय बालिकेस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल ३१ मार्चरोजी प्राप्त झाला. दरम्यान मंगळवारी दुपारी दीड वाजता खामगाव येथील एक शिक्षक मृत व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनास मिळाली. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेने तत्काळ पोलिसांची मदत घेवून संबधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील दोघांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे. खामगाव येथील सजनपूरी भागातील हा व्यक्ती रहिवाशी असून शिक्षक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.   

सजनपुरी परिसर सील!सजनपुरी भागातील तिघांना बुलडाणा येथे हलविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण सजनपुरी परिसर सील करण्यात आला आहे. नगर पालिका पथकाकडून या परिसरात द्रावणाची फवारणी करण्यात आली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा