शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खामगावकरांना स्वच्छतेच्या ध्यासाने झपाटले; प्रशासनासह सामजिक संस्था, शाळा- महाविद्यालयांचाही पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:54 IST

खामगाव:  स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जागृतीचा सकारात्मक परिणाम  खामगावकरांवर होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षणात विद्यार्थी, सामाजिक संस्थांसोबतच नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने, खामगाव पालिकेने स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींगमध्ये उल्लेखनिय आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात विद्यार्थी, सामाजिक संस्थांसोबतच नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादासाठी प्रयत्न केले जात आहेत. सकाळ-संध्याकाळ घंटागाडी फिरविणारी खामगाव पालिका ही एकमेव पालिका ठरली आहे.

- अनिल गवईखामगाव:  स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जागृतीचा सकारात्मक परिणाम  खामगावकरांवर होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षणात विद्यार्थी, सामाजिक संस्थांसोबतच नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने, खामगाव पालिकेने स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींगमध्ये उल्लेखनिय आघाडी घेतली आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे या सर्वेक्षण महत्वाचे मानले जात असतानाच, नागरिकांचा ‘फिडबॅक’ हा या सर्वेक्षणाचा महत्वपूर्ण घटक बनला आहे. परिणामी, पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, विविध उपाययोजनाही पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत. यामध्ये स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींग सोबतच जनजागृतीचाही समावेश असून, भावनात्मक प्रतिसादासाठी ‘स्वच्छता भूत’ अधोरेखीत केले आहे. स्वच्छता आमच्या डोक्यात भीनल्याचे दर्शविण्यासाठी ‘स्वच्छतेचे भूत’ फलकांवर रंगविण्यात येत आहे. तसेच ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडींग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया  हमने! स्वच्छ सर्वेक्षणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच कचरामुक्त शहराची संकल्पना अंमलात आणण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने  सकाळ आणि संध्याकाळ घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. ‘स्वच्छ भारत का इरादा, इरादा करने लिया हमने’ या घोषवाक्याद्वारे शहरातील कचरा निमुर्लन करण्यात येत आहे. सकाळ-संध्याकाळ घंटागाडी फिरविणारी खामगाव पालिका ही एकमेव पालिका ठरली आहे.

६३ टक्के उद्दीष्टपूर्ण!खामगाव शहरासाठी सुरूवातीला अ‍ॅप डाऊनलोडींगसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दीष्टाच्या ६३ टक्क्यांपर्यंत पालिका पोहोचली आहे. यामध्ये १११९  अँड्रॉईड मोबाईल धारकांनी तसेच   ०९  (आयओएस) सिस्टीम मोबाईल धारकांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.  त्यामुळे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडींगचे ६३ टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.

शाळा-महाविद्यालयांना पत्र !स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शाळा- महाविद्यालयांना स्वच्छता अभियानात  सहभाग नोंदविण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, शाळा, तसेच महाविद्यालयांना पत्र देण्यात येत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkhamgaonखामगाव