शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : शिधापत्रिका न दिल्याने लिपिकाची कॉलर धरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:58 IST

खामगाव : तालुक्यातील अनेक लाभार्थींना अनेक महिन्यांपासून शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचे वास्तव आहे. शिधापत्रिका न मिळाल्याने मंगळवारी येथील तहसील कार्यालयात लिपिकासोबत वाद होऊन शेतकºयाने त्याची कॉलर पकडल्याची घटना दुपारी घडली. 

ठळक मुद्देखामगाव तहसील कार्यालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील अनेक लाभार्थींना अनेक महिन्यांपासून शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचे वास्तव आहे. शिधापत्रिका न मिळाल्याने मंगळवारी येथील तहसील कार्यालयात लिपिकासोबत वाद होऊन शेतकºयाने त्याची कॉलर पकडल्याची घटना दुपारी घडली. शिधापत्रिका अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजला जातो. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिक शिधापत्रिका मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतात. रेशन कार्डमधील नावे कमी करणे, नावे वाढविणे, विभक्त रेशन कार्ड काढणे आणि नव्याने रेशन कार्ड काढण्यासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने तहसील आॅफिसला रोज प्रकरणे दाखल करतात; परंतु महिना-महिना होऊनही काही लोकांना रेशन कार्ड मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष वाढला आहे. मंगळवारी दुपारी रेशन कार्ड विभागात कोलोरीच्या काही शेतकºयांनी रेशन कार्डची मागणी केली असता तुमचे रेशन कार्ड झाले नाही, असे संबंधित लिपिकाने सांगितले. त्यामुळे शेतकºयाने चिडून संबंधित लिपिकाची कॉलर पकडली. तेवढ्यात काहींनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा तक्रार दाखल झाली नाही. रोजची मजुरी पाडून शेतकºयांना दररोज तहसील आॅफिसवर चकरा मारणे शक्य नाही. त्यामुळे तहसीलदारांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकºयांना होणारा त्रास कमी करावा व तत्काळ रेशन कार्ड विभागातील कामाला गती द्यावी, ही मागणी होत आहे. 

प्रकरणे निकाली काढली!मागील सहा महिन्यांआधी आमदार आकाश फुंडकर यांनी लक्ष घालून दोन वर्षांची असलेली रेशन कार्डसंबंधी पेंडन्सी पूर्ण करुन घेतली होती. आतासुद्धा नागरिकांकडून तीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

आमच्या विभागात एकच कर्मचारी असल्याने कामात थोडा उशीर होत आहे; परंतु आमच्याकडे जास्त पेंडन्सी नाही. आठवडाभरात आलेली प्रकरणे आम्ही निकाली काढत आहोत.- जी.बी. चव्हाण, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग