शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : तरूणीला ठार करणाऱ्या फरार टिप्पर चालकाला अटक

By विवेक चांदुरकर | Updated: December 30, 2023 16:13 IST

फरार टिप्पर चालकाला ३० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली

खामगाव : २९ डिसेंबर रोजी सायंकाळी शेगांव तालुक्यातील भोनगांव येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेतीची वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या टिप्पर वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गौरी राजेश शेळके या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर टिप्पर चालक फरार झाला होता. फरार टिप्पर चालकाला ३० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२९ डिसेंबर रोजी अपघात घडल्यानंतर भोनगाव, शेगाव येथील नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी शेगाव ग्रामीण पो. स्टेशनमध्ये धाव घेऊन रेती वाहतूक करणारे वाहन व चालकास त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी एम.एच. २८ बीबी २४४० या क्रमांकाच्या टिप्परचा चालक विक्की संजय गोरले (वय २३) याच्या विरोधात २७९, ३०४ अ कलमान्वये गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव येथे आणला असता माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी रुग्णालयात जावून शेळके कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, काही भ्रष्ट महसूल व पोलीस अधिकाऱ्याच्या आशीवार्दाने शेगाव तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात विना नंबर प्लेट असलेल्या गाडयांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरु आहे. यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडून अनेकांचे बळी जात आहे. जनतेने जागरुक राहून अवैध रेती तस्करीविरुद्ध आवाज उठवावा असे सानंदा यांनी सांगितले. यावेळी शेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, खामगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृ.उ.बा.स.चे सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह भोनगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा