शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : ३१ पथविक्रेत्यांना  दहा हजारांचे खेळते भांडवल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:24 IST

अभियानातंर्गत ३१ जणांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएमएसव्हीए निधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची नगरपरिषद खामगाव दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत ३१ जणांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. या योजनेतंर्गत कर्जासाठी खामगाव नगर पालिका क्षेत्रातील १४५ फेरीवाले पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी खामगावातील तब्बल एक हजारापेक्षा जास्त फेरीवाल्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, बँकाचा प्रतिसाद अत्यल्प मिळत असल्याने फेरीवाल्यांची कर्ज वितरणाची प्रक्रीया संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे. पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतंर्गत पथविक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह रुपये दहा हजार पर्यंतचे खेळते भांडवल बँकेतून तारण न घेता कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. कर्ज नियमित परतफेड केल्यास त्यांना ७ टक्के व्याज अनुदान प्राप्त होईल. तसेच पथविक्रेत्याने डिजिटल व्यवहार केल्यास विक्रेत्याला मासिक १०० रुपये पर्यंतचे कॅशबॅक सुविधा देण्यात येणार आहे.  आवश्यक असणारी कागदपत्रेपथविक्रेत्यांचे आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्यांनी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे. किंवा सीएलएफ, चीएलसी, सीएससी केंद्राद्वारे आधार कार्ड, आधार कार्ड संलग्न मोबाइल क्रमांक, मतदानकार्ड, ड्राइव्हिंग लायसेन्स (असल्यास), रेशन कार्ड, टी.सी., पॅन कार्ड, आधार लिंक बॅक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, इत्यादि आवश्यक कागदपत्रासहीत सीएफएफ, सीएलसी, सीएससी केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज सादर करावे.

 आॅनलाइन नोंदणीगुरूवार १२ नोव्हेंबर रोजी सीएसएसी  सहकार्याने बाजारात कॅम्प लावून  फेरीवाल्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे.ी  फेरीवाले यांनी अर्ज भरून घ्यावे, व फेरीवाले यांनी जास्तीत जास्त अर्ज भरून, केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा