शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य वितरणात खामगाव तालुका माघारला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:05 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहता कामा नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते.बुलडाणा जिल्ह्यात ४ लक्ष ८३ हजार ४८७ कार्डधारक आहेत. यापैकी जिल्ह्यातील ४ लक्ष ६३ हजार ९५२ कार्ड धारकांना जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात धान्य वितरीत करण्यात आले.जिल्ह्यातील धान्य वितरणाची सरासरी टक्केवारी ही ९६ टक्के इतकी आहे. यामध्ये जळगाव जामोद (९७.४), संग्रामपूर (९७.२) आणि बुलडाणा (९७.१) तालुक्याने धान्य वितरणात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या खामगाव तालुक्याची रेशन धान्य वितरणात अतिशय सुमार कामगिरी असल्याचे दिसून येते.  खामगाव तालुक्यात ४५ हजार ५८१ कार्ड धारक आहेत.या पैकी ४२ हजार ०८६ कार्ड धारकांनाच धान्य वितरीत करण्यात आले. म्हणजेच खामगाव तालुक्यात ९२.०३ टक्के धान्य वितरण करण्यात आले.बुलडाणा जिल्ह्यात धान्य वितरणाची ही टक्केवारी सर्वात कमी असल्याचे समोर येत आहे.खामगाव पेक्षा शेगावची टक्केवारी जास्त!खामगाव येथील पुरवठा अधिक्षक व्ही. एम.भगत यांच्याकडेच शेगाव तालुक्याचा प्रभार आहे.  कोरोना संचारबंदी काळात  खामगावपेक्षा शेगाव तालुक्याची धान्य वितरणाची टक्केवारी खामगाव तालुक्यापेक्षा जास्त आहे. गत तीन महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असल्याने खामगाव तालुक्यातील अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहे. दरम्यान, शेगावचा प्रभार असतानाही या तालुक्यातील धान्य वितरण जास्त आणि खामगावातील अधिकारी असतानाही खामगाव तालुक्याचे वितरण कमी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आदिवासी तालुक्यात समाधानकारक वितरण! आदिवासी तालुके म्हणून ओळख असलेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात धान्य वितरणाची टक्केवारी सरासरी ९७ टक्क्के आहे. सर्वात मोठ्या खामगाव तालुक्यातील टक्केवारीबाबत प्रश्नचिन्ह आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत खामगाव तालुक्याचा व्याप मोठा आहे. येथील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. धान्य वितरण सुरळीत करण्यातसाठी प्रयत्न केले जात आहेत.-व्ही.एम. भगतपुरवठा अधिक्षक, खामगाव.

 

 

टॅग्स :khamgaonखामगाव