शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहरात अवैध नळ कनेक्शन शोध मोहिम जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:45 IST

खामगाव :  शहरातील अवैध नळ जोडणींकडे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आपला मोर्चा वळविला आहे. बाळापूर फैलातील अ‍ैवध नळ जोडणी घेणाºयांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. बाळापूर फैलात मंगळवारी ऐन सकाळी पालिकेचे पथक धडकल्याने एकच खळबळ उडाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  शहरातील अवैध नळ जोडणींकडे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आपला मोर्चा वळविला आहे. बाळापूर फैलातील अ‍ैवध नळ जोडणी घेणाºयांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. बाळापूर फैलात मंगळवारी ऐन सकाळी पालिकेचे पथक धडकल्याने एकच खळबळ उडाली होती.

शहरातील अवैध नळ जोडणींमुळे वैध कनेक्शन धारकांना पाणी वाटपात अडसर निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींप्रमाणे उन्हाळ्यात पालिकेने तीनवेळा अवैध नळ जोडणीस प्रतिबंध घातला होता. त्यानंतर पुन्हा अवैध नळ जोडणीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर मंगळवारी सकाळी बाळापूर फैलातील अवैध नळ कनेक्शन शोधण्यात आले. यावेळी काही अवैध नळ कनेक्शन धारकांवर कारवाई करण्यात आली. पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा पर्यवेक्षक सुरजसिंह भदोरीया यांनी ही कारवाई केली. या कारवाईचा निषेध म्हणून काही नागरिकांनी विरोधही दर्शविला. काहींनी कारवाई सुरू असताना नळ जोडणी कापण्यास तीव्र विरोध दर्शविला.

नागरिकांचा गोंधळ!

नगर पालिका प्रशासनाच्या अवैध नळ जोडणी शोध मोहिमेदरम्यान, काही नागरिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी नियमित पाणीपट्टी कर भरणाºया नागरिकांचे कनेक्शन जसै थे ठेवण्यात आले. तर कराचा भरणा न करणाºया आणि पावती नसलेल्या सहा जणांची अवैध नळ जोडणी कापण्यात आली.

राजकीय दबावातून कारवाईला स्थगिती!

नगर पालिका प्रशासनाच्यावतीने अवैध नळ जोडणी शोध आणि कापणी मोहिम सुरू असताना ही मोहिम थांबविण्यासाठी प्रयत्न झाले. बाळापूर फैलातील दोन नगरसेवक तात्काळ घटनास्थळी धडकले. अवैध नळ जोडणी पैशांचा भरणा करून वैध होईपर्यंत या मोहिमेला स्थगिती दिली जावी, अशी भूमिकाही नगरसेवकांनी मांडली. त्यामुळे या मोहिमेला स्थगिती दिली. 

‘तार्इं’ची तक्रार आणि ‘दादां’चा फोन!

बाळापूर फैलात अवैध नळ जोडणी शोध मोहिम राबविण्यात येत होती. त्यावेळी या भागातील नगरसेविका ‘ताई’ने पालिकेचा कारभार हाकणाºया ‘दादां’कडे तक्रार केली. तार्इंचा फोन येताच ‘दादां’नी तात्काळ पालिका अधिकाºयांना फोन  केला. त्यानंतर या मोहिमेला स्थगिती मिळाल्याची चर्चा बाळापूर फैलात होती.

टॅग्स :khamgaonखामगावnagaradhyakshaनगराध्यक्ष