शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : नवीन वस्त्यांचा रस्ता प्रश्न सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:07 IST

खामगाव : शहराबाहेर निर्माण झालेल्या नवीन वस्त्यांमधील रस्त्यांचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही. गत उन्हाळ्यात पावसाळ्यापुर्वी रस्ते बांधकामाचे आश्वासन देण्यात आल्यानंतरही रस्ते बांधण्यात आले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहराबाहेर निर्माण झालेल्या नवीन वस्त्यांमधील रस्त्यांचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही. गत उन्हाळ्यात पावसाळ्यापुर्वी रस्ते बांधकामाचे आश्वासन देण्यात आल्यानंतरही रस्ते बांधण्यात आले नाहीत. परीणामी सध्या या भागातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. गुरूदत्त नगरसह परिसरातील नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत.खामगाव शहराच्या आजुबाजूने गत काही वर्षांपासून अनेक नवीन लोकवस्त्या निर्माण झाल्या आहेत. घाटपुरी परिसरात गुरूदत्त नगर, चोपडेच्या मळयामागील वस्ती, नवनाथ मंदिरामागील वस्ती यासह अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना सुविधा मिळताना दिसत नाहीत. परिणामी या भागात राहणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. समस्या सोडविण्याचे वेळोवेळी आश्वासन मिळत असले, तरी समस्या काही पिच्छा सोडताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे शहरालगतच्या या नवीन वस्त्यांमध्ये अनेक पक्की घरे झालेली आहेत. घरांची संख्याही मोठी आहे. परंतु नागरिकांना अद्याप सुविधा मिळाल्या नाहीत. पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर चिखल होतो. सध्या नागरिकांना चिखलातून गाड्या तर सोडा, परंतु चालणेही मुश्किल होत असल्याचे दिसून येते. नागरिकांनी अनेकदा त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नसल्याचे दिसून येते. नवीन वस्त्यांमधिल पाणी समस्याही गंभीर रूप धारण करते. या भागात अद्याप नळ पोहचले नाहीत. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी व्हॉल्व्हवर उन्हातानात उभे राहावे लागते. मतदानाच्या वेळी होते आठवण!नवीन वस्त्यांमधिल समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. नागरिक जेव्हा मुद्दा उपस्थित करतात, तेव्हा हा भाग नगर परिषदेअंतर्गत की ग्राम पंचायत अंतर्गत, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र मतदानाच्या वेळी मात्र हा मुद्दा उपस्थित होत नाही. तेव्हा या भागातील नागरिकांची आठवण केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. दरम्यान विकास कामांसाठीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगाव