शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीवर धनाड्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 15:39 IST

Corona Vaccination : आरोग्य कर्मचाऱ्यांची लस श्रीमंतांना दिली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘हेल्थ केअर’वर्कर आणि फ्रंन्टलाइन कामगारांच्या लसीकरणात खामगावातील काही धनाड्यांनी हात धुवून घेतल्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार खामगावात उघडकीस आला आहे. कागदोपत्री बनावट हेल्थ वर्कर बनत, काही नामांकित श्रीमंत कुटुंबातील व्यक्तींनी खºया हेल्थ वर्करच्या हक्काची लस पळविण्याची जोरदार चर्चा आता आरोग्य वर्तुळात होत आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आरोग्य क्षेत्रासोबतच संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्य शासनाकडून टप्प्याने लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये १६ जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंन्टलाईन कामगारांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. खामगाव शहरातील लसीकरणाच्या या टप्प्यात शहरातील काही सधन कुटुंबातील व्यक्तींनी लसीकरण केले. या धनाड्यांच्या लसीकरणासाठी काही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घेतला. काहींनी आपल्या ‘मैत्रीं’चा धागा घट्ट करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावल्याचेही दिसून येते.  कोरोनाच्या धास्तीने शहरातील काही धनाड्य चक्क एका नामांकित रूग्णालयात कागदोपत्री कर्मचारी बनलेत. तर एका धनाड्यांचा मुलगा दुसºया एका रूग्णालयात वार्ड बॉय बनला. अशाप्रकारे १६ ते ३० जानेवारी दरम्यान कागदाला कागद जोडून १४ धनाड्यांचे बनावट हेल्थ केअर वर्कर म्हणून लसीकरण झाले.

लसीकरणासाठी हॉस्पीटलमध्ये बनले कामगार!-खामगाव शहरात नावलौकीक असलेल्या आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका धनाड्य कुटुंबातील चक्क ७ जणांनी हेल्थ केअर वर्कर म्हणून लसीकरण केले. यासाठी शहरातील एका नामांकित सर्व सुविधायुक्त हॉस्पीटलमध्ये कामगार म्हणून कागदोपत्री नोकरी पत्करली. तर शहराच्या मध्य वस्तीतील एक युवा उद्योजक चक्क एका खासगी रूग्णालयात वार्ड बॉय तर दुसरा एक व्यक्ती पर्यवेक्षक बनला. त्याचप्रमाणे उर्वरीत ०५ जणांनी अशाप्रकारेच बनावट कागदपत्रे जोडून लसीकरण केले.

-हेल्थ केअर वर्करच्या जागी धनाड्य आणि त्यांच्या नातेवाईकांनी लसीकरणाचा प्रकार गंभीर आहे. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आपले कुटुंबीय आणि मित्रमंत्रळींचे रूग्णालयात कामगार म्हणून लसीकरण केल्याची चौकशी केली जाईल. कारवाई करीत तक्रारदारांचे तात्काळ  समाधान केले जाईल.- डॉ. बाळकृष्ण कांबळेजिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावCorona vaccineकोरोनाची लस