शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनांवर कारवाईत खामगाव पोलीस अग्रेसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 11:41 IST

Khamgaon traffic police News दहा हजारांपेक्षा जास्त दुचाकीस्वारांना खामगाव पोलिसांनी गत वर्षभरात आपला हिसका दाखविला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त दुचाकीस्वारांना खामगाव पोलिसांनी गत वर्षभरात आपला हिसका दाखविला. या वाहनधारकांकडून ३६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याने कारवाई आणि दंडवसुलीत खामगाव पोलीस जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे दिसून येते.गत वर्षभरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. समज देऊनही वाहनचालकांच्या वर्तणुकीत बदल न घडल्याने शहर पोलिसांनी कारवाईवर भर दिला. यामध्ये खामगाव शहर आणि परिसरात १० हजार ८७९ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये त्यांच्याकडून ३७ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहर आणि परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात मदत झाली. 

कोरोना काळात सर्वाधिक कारवाया खामगावात !कोरोना संचारबंदी कालावधीत वाहतूक नियमांचे तसेच कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचे भंगप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई खामगाव शहर पोलिसांनी केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्यांना ‘योग आणि प्राणायमाची’ अनोखी शिक्षा शहर पोलिसांनी केली होती.

अवैध प्रवासी वाहतुकीलाही वेसण !खामगाव शहर आणि परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली. गत वर्षभरात शहर पोलीस स्टेशन हद्दीत ३५६ कारवाई करण्यात आल्या. या कारवाईच्या माध्यमातून १३ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाहतुकीला वळण लावण्यासाठी गत वर्षभरात दहा हजारांपेक्षा जास्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूकप्रकरणी ३५६ कारवाई शहर पोलिसांनी केली आहे.- सुनील अंबूलकरपोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव 

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस