शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Khamgaon News : डम्पिंग ग्राऊंडवरील धग थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:31 IST

Khamgaon News: कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल १६ बंब रिचविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा पेटविण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते. रविवारी सकाळी घाटपुरी रोडवरील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याने पुन्हा पेट घेतला. त्यामुळे कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल १६ बंब रिचविण्यात आले. तरी देखील सोमवारपर्यंत कचऱ्याला लागलेली आग आटोक्यात आलेली नव्हती.खामगाव शहरातील विविध वस्तींमधून संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट घाटपुरी रोडवरील डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते. दरम्यान, गत काही महिन्यांपासून खामगाव येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सातत्याने पेट घेत आहे. कचऱ्याला वारंवार लागत असलेल्या आगीमुळे गोपाळ नगर, घाटपुरी नाका, पंजाब ले-आऊटसह परिसरात धुराचे लोट पसरतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर ऐन कोरोना काळात विपरित परिणाम होत असल्याने, पालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.  तीन दिवसांनंतरही ही आग आटोक्यात आलेली नव्हती. त्यानंतर तब्बल तीनवेळा या ठिकाणी आग लागली.  बायो मेडिकल वेस्टचे संकलन केल्यानंतर डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्या जातो. त्यानंतर हा कचरा पेटविण्यात येत असल्यानेच डम्पिंग ग्राऊंडला आग लागत असल्याची चर्चा आहे.

नागरिकांच्या भावनांचा उद्रेक; निषेध म्हणून नगराध्यक्षांच्या घरासमोर जाळला कचरा!डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला वारंवार आग लागते. त्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे त्वचा आणि इतर आजार वाढीस लागलेत. कोरोना काळात पालिकेचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गोपाळ नगर आणि परिसरातील संतप्त नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. पालिकेत विविध आंदोलन केल्यानंतरही काहीच उपयोग न झाल्याने, या भागातील संतप्त युवकांनी निषेध म्हणून चक्क नगराध्यक्षांच्या घरासमोर कचरा पेटविला होता. मात्र, त्यानंतरही डम्पिंग ग्राऊंडवर जळणाऱ्या कचऱ्याची धग थांबत नसल्याचे चित्र आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावdumpingकचराfireआग