शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मास्क शिलाई उपक्रमात खामगाव नगर पालिका अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 11:44 IST

Khamgaon Municipality tops in mask sewing initiative खामगाव पालिकेने राज्यातील १५ नगर पालिकांमध्ये अव्वलस्थान पटकाविले आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: दीनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजिविका अभियानतंर्गत युनिसेफच्या आर्थिक मदतीने राबविल्या जाणाºया मास्क शिलाई आणि कोविड-१९ प्रतिबंधाबाबत जनजागृतीत खामगाव पालिकेने राज्यातील १५ नगर पालिकांमध्ये अव्वलस्थान पटकाविले आहे. त्याचप्रमाणे कोविड जनजागृती आणि महिला सक्षमीकरणातही खामगाव पालिका अग्रेसर ठरली आहे.मास्क शिलाई आणि कोविड-१९ जनजागृतीमध्ये राज्यातील १५ नगरपरिषदांमधील स्वयंसहाय्यता बचतगटांमधील सदस्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामध्ये साधारण अडीच लाख मास्क तयार करणे व कोविड-१९ बाबत विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रामुख्याने महिलांच्या कौशल्यामध्ये वाढ करणे, छोट्या उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी चालना देणे, आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देणे, कोविड-१९ बाबत स्वत: सोबतच आपल्या कुटुंबाची व इतरांचीही काळजी घेणे, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शहर स्तरीय संघांनाही या कार्यक्रमामधून आर्थिक मदत उपलब्ध झाली आहे, या संस्था शहरी गरिबांच्या सक्षमीकरणासाठी व उपजीविका विकासासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत.

 जनजागृती खामगाव पालिका अव्वल!खामगाव नगर परिषदेने याकामी विशेष पुढाकार घेऊन या कामाचा प्रगती अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने ही छोटी फिल्म तयार केली आहे. तसेच मास्क निर्मिती आणि प्रशिक्षणात खामगाव पालिकेची उल्लेखनिय कामगिरी ठरत आहे.

 

 खामगाव पालिकेचे अभियान व्यवस्थापक राजेश झनके यांच्यासह एनयुएलएम सेलमधील त्यांच्या प्रत्येक सहकाºयांनी उल्लेखनिय चित्र फित तयार केली आहे.  ही राज्यातील पालिकांमध्ये हीट ठरत आहे.- मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव. 

 

कोविड-१९ जनजागृतीबाबत  खामगाव पालिकेचे मुख्याधिकारी एनयुएलएम सेलच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी विशेष प्रयत्न केले आहे. त्यांच्या या कामाचे राज्यातील इतर महापालिका आणि नगर पालिकांनीही अनुकरण करावे.-डॉ. किरण कुळकर्णीसंचालक तथा आयुक्तनगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.

टॅग्स :khamgaonखामगाव