शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : नगरपालीका कर विभागाने केली तीन दिवसांत ५0 लाख रुपयांची  वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:18 IST

खामगाव : येथील नगरपालिकेच्या कर विभागाने  सन २0१७-१८ या आर्थिक  वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन  दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५0 लाख रुपयांची वसुली केली आहे; मात्र  शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून खामगाव  पालिका  शंभर टक्के वसुली करण्यास  अपयशी ठरणार असल्याचे संकेत  आहेत.

ठळक मुद्देशासकीय कार्यालयांकडून प्रतिसाद शुन्य

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील नगरपालिकेच्या कर विभागाने  सन २0१७-१८ या आर्थिक  वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन  दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५0 लाख रुपयांची वसुली केली आहे; मात्र  शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून खामगाव  पालिका  शंभर टक्के वसुली करण्यास  अपयशी ठरणार असल्याचे संकेत  आहेत.सन २0१७-१८ मध्ये थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ८ कोटी  ५५ लाख ७१ हजार २३४ रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या उद्दिष्टाचा  पाठलाग करताना करवसुलीसाठी पालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत  असून, एप्रिल २0१७ ते ऑक्टोबर २0१७ या सात महिन्यांच्या कालावधीत  पालिकेची केवळ ७८ लाख ८८ हजार ७९८ रुपयांची वसुली केली असून,  नोव्हेंबर अखेरीस करण्यात आलेल्या रकमेची टक्केवारी केवळ ९.२२ टक्के  एवढीच होती.   डिसेंबर महिन्यात पालिका प्रशासनाने वसुलीसाठी कंबर  कसली असून, कर वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वसुलीच्या  आकडेवारीत वाढ झाली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरनंतर कराचा भरणा  केल्यास मालमत्ताधारकांना २ टक्के शास्ती लागणार आहे. परिणामी,  मालमत्ताधारकांकडून  कराचा भरणा करण्यास प्राधान्य दिल्याने सोमवार ते  बुधवार या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ५0 लाख रुपयांची वसुली  झाली आहे.  शासकीय कार्यालयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे  दिसून येते.

तर लागणार दोन टक्के शास्ती!शहरातील सर्वच मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत कराचा भरणा करणे अ पेक्षित आहे. ३१ डिसेंबर नंतर कराचा भरणा करणार्‍यांवर २ टक्के शास्ती  लावल्या जाईल. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून सहकार्य  करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

अन्यथा नळ जोडणीही तोडणार!३१ डिसेंबरनंतर  मालमत्ता कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार  आहे. यामध्ये नळ कनेक्शन जोडणी कारवाईचा भाग म्हणून थकबाकीदारांचे  नळ कनेक्शन कापण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती नगरपालिका  सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मालमत्ता जप्तीसोबतच, इतरही कायदेशीर कारवाई पासून सुटका  करण्यासाठी, ३१ डिसेंबरपर्यंत सर्व थकबाकीदारांनी थकीत कराचा भरणा  करून पालिकेस सहकार्य करावे. उद्दिष्टपूर्तीसाठी विविध उपाययोजना पालिका  प्रशासनाकडून केल्या जात आहे.- धनजंय बोरीकर, मुख्याधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर