शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगर पालिका कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 15:47 IST

खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी  बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी  बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे पालिकेतील अनेक विभागांना मंगळवारी कुलूप दिसून आले. या  संपामुळे पालिकेतील महत्वाच्या विभागासह अत्यावश्यक सेवाही प्रभावित झाल्या आहेत.

नगर पालिका कर्मचाऱ्यांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, २४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी आदी २० मागण्यांकरिता  कर्मचारी संघटनेने १ जानेवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला होता. टप्प्या-टप्प्याने शनिवारपासून पालिका कर्मचाºयांनी आंदोलनही छेडले. या आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणून मंगळवारपासून कर्मचाºयांनी कामबंद  (संप) आंदोलनास प्रारंभ केला.  यावेळी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत निळे आणि कार्यकारी सदस्य मोहन अहीर, मंगेश पंचभुते, सुभाष शेळके, दुर्गासिह ठाकूर, सुनील सोनोने यांच्या नेतृत्वात  पालिका कर्मचाºयांनी निदर्शने केली.

लोकप्रतिनिधींची संप स्थळी भेट!

नगर पालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला तसेच कर्मचाºयांच्या न्याय मागण्यांना पाठींबा दर्शविण्यासाठी खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळास भेट दिली. पालिकेसमोरील मंडपात त्यांनी पालिकेच्या विविध कर्मचाºयांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा यांच्यासह काँग्रेस पदाधिकाºयांनीही पालिका कर्मचाºयांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.

पाच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर पालिकेचे कामकाज!

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगर पालिकेतील कर्मचारी संपावर गेल्यामुळे शहरातील विविध सेवा प्रभावित झाल्या. दरम्यान,  वैभव माळवंदे, मनोज राजपूत या कंत्राटी कर्मचाºयांसह रचना सहाय्यक अनुराग घीवे, रचना सहाय्यक सागर काळे आणि गोपाल तार्डे या नव्यानेच रूजू झालेल्या पाच कर्मचाºयांनी पालिकेचे कामकाज सांभाळले.

टॅग्स :khamgaonखामगावStrikeसंपEmployeeकर्मचारी