शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगर पालिका: स्पर्धात्मक निविदा हरताळ प्रकरणी चौकशीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:03 IST

कंत्राटदारांच्या मोघम आणि अस्पष्ट उत्तरांमुळे पाच सदस्यीय समितीने कमालिचा संताप व्यक्त केला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेतील नागरी दलितवस्ती योजनेंतर्गत  उभारण्यात आलेल्या मिनी हायमास्टच्या निविदा प्रकरणी गुरूवारी चौकशीस प्रारंभ झाला. यामध्ये कंत्राटदारांच्या मोघम आणि अस्पष्ट उत्तरांमुळे पाच सदस्यीय समितीने कमालिचा संताप व्यक्त केला. कंत्राटदारानी दिलेल्या उडवा उडवीच्या उत्तरांमुळे समितीप्रमुखांसह सदस्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा दावा सुत्रांनी केला. समितीच्या तटस्थ भूमिकेमुळे निविदा मॅनेज प्रकरण अनेकांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत विविध भागात मिनी हायमास्ट लावण्यासाठी एकाच कंत्राटदाराने २० कामांच्या पूरक निविदांसह ६० निविदा भरण्यात आल्याची तक्रार स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मा यांनी केली. या तक्रारीच्या अनुषंगाने खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ फासण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीने गुरूवारी आपल्या चौकशीस सुरूवात केली. यामध्ये नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्यासह मिनी हायमास्टच्या कंत्राटासाठी निविदा दाखल करणाºया तीन कंत्राटदारांसह तक्रारकर्ते नगरसेवक संदीप वर्मा यांनीही आपली बाजू मांडली. यावेळी कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्यासाठी सत्ताधाºयांनी निविदा मॅनेज केल्याचा आरोप तक्रारकर्ते संदीप वर्मा यांनी केला. चौकशी समितीला सामोरे जाताना नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी निविदा प्रक्रीया आॅनलाईन पध्दतीने असून, कोणीही आणि कुठेही दाखल करू शकतो. निविदा प्रक्रीयेतील पारदर्शकता समोर आणण्यासाठीच चौकशीसाठी आपणच पुढाकार घेतल्याचे समिती समोर स्पष्ट केले. त्यावेळी नगराध्यक्षांची बाजू खोडताना आॅनलाईन निविदा प्रक्रीया मॅनेज करण्याचा हा सर्वोत्तम नमुना असल्याची बाजू तक्रारकर्ते वर्मा यांनी समितीसमोर मांडली. याप्रकरणी  लेखी खुलासे आणि खाते उतारे सादर करण्याचे निर्देश देत, चौकशी समितीने ही सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित केली. त्यामुळे याप्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावनी होणार असल्याचे समजते. दरम्यान, सदर प्रकरणी चौकशी सुरू असे पर्यंत कंत्राटदारांची देयके देऊ नयेत, असेही तक्रारकर्ते वर्मा यांनी समितीसमोर सुचविले.

 एकाच कंत्राटदाराने भरली खात्यातून रक्कम!शहरातील २० ठिकाणी उभारण्यात येणाºया मिनी हायमास्ट लाईटचा कंत्राट मिळविण्यासाठी तीन पैकी एकाच कंत्राटदाराने स्वत:च्या खात्यातून रक्कम भरल्याचे चौकशी समितीसमोर उघड झाले. यावेळी उर्वरीत दोन कंत्राटदारांच्या संदिग्ध भूमिकेबाबत आक्षेपही चौकशी समितीने नोंदविले. चौकशी समितीमध्ये अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, विद्युत पर्यवेक्षक सतीश पुदाके, लेखापाल अक्षय जोरी, अंतर्गत लेखापाल आदित्य शिवेकर यांचा समावेश आहे.

 निविदा प्रकरणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारीला डावलून कार्यादेश देण्यात आला आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील विद्युत विभागात किती कामे निविदा बोलावून करण्यात आली. त्यापैकी किती कामाच्या निविदेत प्रकरणात असलेल्या तिन्ही कंत्राटदारांनी भाग घेतला आहे.  चौथे निविदाकार का अपात्र ठरले? याची कामनिहाय माहिती प्रकरणाच्या अभिलेखावर घेण्यात यावी.- संदीप वर्मातक्रारकर्ता तथा स्वीकृत नगरसेवकखामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव