शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेची दीडपट उद्दिष्टपूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:14 IST

खामगाव : स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत नियोजित उद्दिष्टापेक्षा ५0 टक्के अधिक कामगिरी केली आहे. त्यामुळे शौचालय बांधकामात खामगाव पालिकेने जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिकांना मागे टाकल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानजिल्ह्यातील पालिकांना टाकले मागे

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :      स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत नियोजित उद्दिष्टापेक्षा ५0 टक्के अधिक कामगिरी केली आहे. त्यामुळे शौचालय बांधकामात खामगाव पालिकेने जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिकांना मागे टाकल्याचे दिसून येते.  शहरातील २९ हजार ९६५ मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करून नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी ३२५0 शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्‍चित केले. दरम्यान, शहरातील उघड्यावरील हगणदरी करणार्‍यांची संख्या लक्षात घेता, पालिका प्रशासनाकडून फेरसर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात शौचालय नसणार्‍या १४२९ लाभार्थींची वाढीव यादी तयार करण्यात आली. यापैकी १४00 जणांचे शौचालयांसाठी अर्ज भरून घेण्यात आले. दरम्यान, पालिकेच्या या भूमिकेमुळे खामगाव शहरात उद्दिष्टापेक्षा दीडपट अधिक शौचालयांची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान, उद्दिष्टापेक्षा अधिक ५0 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारी खामगाव नगरपालिका जिल्ह्यात एकमेव पालिका असल्याचे उपलब्ध आकडेवरून दिसून येते. दरम्यान, जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत हगणदरीमुक्त अभियान सुरू असून, गुड मॉर्निंग पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

हगणदरीमुक्तीसाठी पालिकेचे प्रयत्न!स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा एक भाग म्हणून खामगाव नगरपालिकेने स्वच्छ शहराच्या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर शहरातील उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. उघड्यावर हगणदरी करणार्‍या ३२ नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

असे आहे शौचालय बांधकामाचे अनुदान!स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यामध्ये सहा हजारांचा पहिला हप्ता दिल्या जातो. दुसरा हप्ताही सहा हजारांचा असून, उर्वरित पाच हजारांचा शेवटचा हप्ता पालिका प्रशासनाकडून प्रदान करण्यात येतो. लाभार्थींच्या बँक खात्यात संपूर्ण अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. 

खामगाव शहराच्या फेरसर्वेक्षणानंतर शौचालय बांधकामासाठी अतिरिक्त लाभार्थी मिळाले. त्यानुषंगाने उद्दिष्टापेक्षा अधिक नागरिकांना शौचालय योजनेचा लाभ दिल्या जात आहे. संपूर्ण हगणदरीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत.- धनंजय बोरीकर,मुख्याधिकारी, खामगाव.