शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगर पालिका इमारतीच्या तळघरात शिरले पावसाचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:43 IST

प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या तळघराच्या प्रवेशद्वारावर तब्बल गुडघाभर पाणी साचले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेच्या तळघरात मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे तळघरात ठेवलेल्या साहित्याची नासधूस झाल्याचे दिसून येते. मात्र, याबाबत खामगाव नगर पालिकेचा सामान्य प्रशासन आणि भांडार विभाग अनभिज्ञ असल्याचे समजते.खामगाव नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या खाली एक मोठे तळघर आहे. या तळघरात स्वच्छता आणि इतर कामासाठी लागणारे साहित्य तसेच पालिकेच्या जाहिरातीसाठी लागणाऱ्या लोखंडी फे्रम ठेवण्यात आल्या आहेत. काही लोटगाड्या आणि इतर साहित्यही या तळघरात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गत आठवड्यात खामगाव शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पालिकेच्या तळघरात शुक्रवारपासून मोठ्याप्रमाणात पाणी साचले. रविवारीही देखील या पाण्यात भर पडली. त्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या तळघराच्या प्रवेशद्वारावर तब्बल गुडघाभर पाणी साचले. मात्र, याबाबत सामान्य प्रशासन विभागासोबतच भांडार विभागाला कोणतीही माहिती नव्हती. काही जणांनी ही बाब भांडार विभागाच्या निर्दशनास आणून दिली. मात्र, तरी देखील सोमवारी सायंकाळपर्यंत तळघरातील पाणी काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा