शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

हद्दवाढीविनाच होणार खामगाव पालिकेची निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 12:03 PM

Khamgaon Municipal counsil election नगर पालिकेची आगामी निवडणूक ही हद्दवाढीशिवाय पार पडणार असल्याचे संकेत आहेत.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  शहराची हद्दवाढ पुन्हा ‘प्रक्रिये’च्या कचाट्यात अडकली आहे.  त्यामुळे पाच ग्रामपंचायतींचा ‘ग्रामीण टू शहरी’ होण्याच्या प्रतीक्षेला ब्रेक लागला असून, नगर पालिकेची आगामी निवडणूक ही हद्दवाढीशिवाय पार पडणार असल्याचे संकेत आहेत.गत काही दिवसांपूर्वी खामगाव नगर पालिकेच्या हद्दवाढीच्या हालचालींनी कमालीचा वेग घेतला होता. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी कच्ची वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.  डिसेंबर २०२१ अखेरीस मुदत संपणाऱ्या खामगाव पालिकेचाही निवडणूक पूर्व कार्यक्रम जाहीर झाला.  खामगाव शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव ‘प्रक्रिये’त अडकला आहे. परिणामी, निवडणुकीपूर्वी  खामगाव ग्रामीण, सुटाळा , सजनपुरी, सारोळा आणि घाटपुरी या पाच ग्रामपंचायतींची ‘ग्रामीण टू शहरी’ होण्याची  प्रतीक्षा कायम असल्याचे एकंदरीत चित्र येथे दिसत आहे.

अशी राहील वाॅर्डांतील लोकसंख्या ! n सन २०११ च्या जनगणनेनुसार खामगाव शहराची लोकसंख्या ९४ हजार १९१ इतकी आहे. दर्जानुसार ब-वर्ग नगर पालिका असलेल्या खामगावात ३३ वाॅर्ड संख्या निश्चित केली जाईल. n निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका वाॅर्डातील लोकसंख्या ही कमीत कमी २५७९ ते जास्तीत जास्त ३१३९ इतकी राहणार असल्याचे समजते.

वाॅर्डांची संख्याही         जैसे थे! खामगाव पालिकेची हद्दवाढ झाल्यास कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त सहा जागांची भर पडेल. त्यानुसार खामगाव शहरात ३७ ते ३९ वाॅर्ड तयार होतील. मात्र, आता हद्दवाढ रखडल्याने शहरातील जुनीच म्हणजे ३३ इतकी वाॅर्ड संख्या कायम ठेवत, आगामी निवडणूक पार पडेल. 

नगराध्यक्ष नगरसेवकांमधूनच! गत निवडणुकीच्या तुलनेत आगामी काळात प्रभाग पद्धती ऐवजी वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणूक होईल. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून निवडला जाणार  आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव