पदाधिकारी, नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 11:05 AM2021-07-20T11:05:58+5:302021-07-20T11:06:23+5:30

khamgaon municipal council : उपस्थितांसमोरच नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली.

khamgaon municipal council : Standoff among office bearers, municipal chiefs! | पदाधिकारी, नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी!

पदाधिकारी, नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक नगरपालिकेतील विकासकामांमधील दिरंगाईबाबत सोमवारी दुपारी एक नगसेवक आणि दोन भाजप पदाधिकारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले.  यावेळी काही मुद्दयांवरून मुख्याधिकारी आणि उपस्थितांपैकी एका भाजप नगरसेवकाची असहमती झाली. त्यामुळे उपस्थितांसमोरच नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली.
 खामगाव नगरपालिकेतील विकासकामे आणि ढेपाळलेल्या कारभाराबाबत भाजपचे एक नगरसेवक, पालिकेचे कामकाज चालविणारे कारभारी आणि दुसरे एक भाजप पदाधिकारी असे तिघे दुपारी तीन-साडेतीन वाजता दरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले. यावेळी विकासकामांसोबतच काही मुद्दयांवर मुख्याधिकारी आणि उपस्थितांमध्ये चर्चा झाली. प्रशासकीय मुद्दा हाती लागताच उपस्थित नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही असंवैधानिक कामावरून मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे उद्विग्न झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधिताला चांगलेच सुनावले, तसेच वैतागून ‘आपली इच्छा असेल तर मी उद्यापासून पालिकेत येत नाही.’ मात्र, चुकीच्या कामांना अजिबात समर्थन करणार नसल्याचेही स्पष्ट केले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील वातावरण तापल्याचा ‘वणवा’ पालिकेत सर्वदूर पसरला. मोठमोठ्याने आवाज ऐकू येत असल्याने कर्मचारी आणि अधिकारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाच्या दिशेने धावले. 


भाजप पदाधिकाऱ्यांतच मतभिन्नता!
नगरपालिकेतील ढेपाळलेला कारभार आणि विकासकामातील दिरंगाईबाबत मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्याशी माजी पदाधिकारी तथा नगरसेवक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी एका भाजप पदाधिकाऱ्याने मौन राहणे पसंत केले. त्याचवेळी दुसऱ्या एका भाजप पदाधिकाऱ्याने (कारभारी दादाने) मुख्याधिकाऱ्यांची बाजू सावरून धरली. त्यामुळे खडाजंगी दरम्यान उपस्थित असलेल्या तिघांमध्येच मतभिन्नता दिसून आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली. दरम्यान, वर्षभरापूर्वीच या नगरसेवकाचे भाजप पदाधिकाऱ्याशी बिनसले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांवर हावी झालेल्या नगरसेवकाला तोंडघशी पाडत, या पदाधिकाऱ्याने जुना वचपा काढल्याची जोरदार चर्चा पालिकेत या घटनेनंतर रंगली.

Web Title: khamgaon municipal council : Standoff among office bearers, municipal chiefs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.