शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेच्या सभेवर विरोधकांचा बहिष्कार;  आरोप-प्रत्यारोपाने गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:54 IST

खामगाव: खास सभेच्या सुचनेचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. तीव्र निदर्शने आणि नारेबाजी करीत विरोधकांनी सभागृह सोडले. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता. 

ठळक मुद्देशहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी १९ विषयांची सूची असलेली खास सभा शुक्रवारी बोलाविण्यात आली. या सभेची सुचना ३ दिवस अगोदर न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात आवाज उठविण्यात आला. सभागृहाबाहेर पडल्यानंतर नगरसेवकांनी पालिका आवारात तीव्र निदर्शने केली. त्यामुळे पालिकेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

खामगाव: खास सभेच्या सुचनेचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. तीव्र निदर्शने आणि नारेबाजी करीत विरोधकांनी सभागृह सोडले. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता. 

शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी १९ विषयांची सूची असलेली खास सभा शुक्रवारी बोलाविण्यात आली. या सभेची सुचना ३ दिवस अगोदर न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात आवाज उठविण्यात आला. सभाशास्त्रांच्या नियमांचे उल्लंघन करून आयोजित सभा पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत, काँग्रेस नगरसेवकांनी सभागृह सोडले. सभागृहाबाहेर पडल्यानंतर नगरसेवकांनी पालिका आवारात तीव्र निदर्शने केली. त्यामुळे पालिकेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, विरोधकांच्या बर्हिगमनानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये पालिकेची सभा पार पडली. या सभेत विषय सुचीवरील १९ आणि एका वेळेवरील विषयाला मंजुरी देण्यात आली. सभेला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस गटनेत्या अर्चनाताई टाले आणि नगरसेवक अमय सानंदा यांनी सभेचा मुद्दा उपस्थित केला. नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी अनिताताई डवरे यांनी विरोधी सदस्यांचा मुद्दा खोडून काढल्यानंतर विरोधी नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. 

झेंडावंदनास पालिकेची पूर्व परवानगी आवश्यक!

जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतंर्गत आलेल्या निविदा तसेच, राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतंर्गत  पीएमसीकरीता आलेल्या निविदांसोबत इतर २० विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक जागेवर पालिकेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय झेंडावंदन घेवू नये, असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. उपरोक्त ठराव पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा यांनी मांडला. या ठरावाला नगरसेवक सतिशआप्पा दुडे यांनी अनुमोदन दिले.

टॅग्स :khamgaonखामगावNagar Bhavanनगरभवन