शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

खामगाव नगरपालिकेचा कारभार रामभरोसे !

By admin | Updated: July 10, 2014 01:33 IST

खामगाव नगरपालिकेचे अधिकारी दौर्‍यावर

गिरीश राऊत / अनिल गवई/ खामगावप्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर नगर पालिकेचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे. नगर पालिकेतील अधिकारी दौर्‍यावर तर कर्मचारी वार्‍यावर असल्याचे चित्र नगर पालिकेच्या सर्वच विभागात आहे. अधिकारी कर्मचारी जागेवर नसल्याने नगर पालिकेतील विविध कामे प्रभावित झाल्याचेच लोकमतने आज दूपारी १२ ते २ वाजे पर्यंत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले .नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नगरपालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर नगर पालिकेतील राजकीय हस्तक्षेप संपुष्टात आला आहे. त्याचप्रमाणेच प्रशासकांकडे अतिरिक्त प्रभार असल्याने त्यांना नगर पालिकेशी काही सोयर सूतक नसल्याचे दिसून येते. प्रशासक पदाची सुत्रे घेईपर्यंतच उपविभागीय अधिकारी नगर पालिकेत उपस्थित राहिले. मात्र, त्यानंतर प्रशासकाकडील कारभाराचा व्याप पाहता नगर पालिकेत येण्याची शक्यता नसल्याने आधीच सैरभैर झालेले नगर पालिका कर्मचारी चांगलेच मोकाट झाले. काही कर्मचारी तर चक्क कार्यालयीन वेळेतच गायब राहत असल्याचे चित्र आहे. मुख्याधिकार्‍यांसह अनेक विभागाचे प्रमुख आज बुधवारी बुलडाणा आणि अकोला येथे दौर्‍यावर होते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत आज नगर पालिकेतील कारभार चांगलाच ढेपाळला होता. वरिष्ठ नसल्यामुळे नगर पालिकेतील अनेक विभागातील कर्मचार्‍यांनी अघोषीत सुटीचा मनमुराद आनंद लुटला.