शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगरपालिकेवर नामुश्की : पाणी पुरवठा योजनेची निविदा घ्यावी लागली मागे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:40 IST

खामगाव : शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेचा ‘कार्यादेश’ तांत्रिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीबाबतची निविदा मागे घेण्याची नामुश्की पालिका प्रशासनावर ओढवणार असल्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देपालिकेचा ‘कार्यादेश’ तांत्रिक अडचणीत सापडला आहे

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेचा ‘कार्यादेश’ तांत्रिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीबाबतची निविदा मागे घेण्याची नामुश्की पालिका प्रशासनावर ओढवणार असल्याचे संकेत आहेत. निविदा मंजूर केल्यानंतर दहा महिन्यांचा अवधी लोटूनही कार्यादेश देण्यासाठी विलंब होत असल्याने, पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी संबंधितांनी असर्मथता दर्शवली आहे. खामगाव शहर पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती; परंतु जीवन प्राधिकरणाचा खर्च जास्त असल्याने नगरपालिकेने योजनेची देखभाल दुरुस्ती स्वत:च करण्याचे ठरविले. यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने निविदाही मागविण्यात आल्या; परंतु सदर योजना देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे सोपविण्यास प्राधिकरण तयार नाही. दरम्यान, पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन निविदा प्राप्त झाल्यानंतर सर्वात कमी रकमेची निविदा पालिकेकडून मंजूर करण्यात आली. यासंदर्भात ३१ मार्च २0१७ च्या सभेतील ठराव क्रमांक १६ नुसार निविदा मंजूर झाल्याचे पत्र आर्वी येथील कंत्राटदारास देण्यात आले. दहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतरही कार्यारंभ आदेशास विलंब होत आहे.  योजनेचे हस्तांतरण झाल्याशिवाय संबंधित कंत्राटदारास देखभाल दुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश देणे शक्य नाही. 

हस्तांतरण लांबणीवर!पाणी पुरवठा योजनेच्या हस्तांतरणासाठी जीवन प्राधिकरणातील कर्मचार्‍यांच्या हस्तांतरणासोबतच थकबाकी अदा करणे आणि बँक गॅरंटीची नवीन अट घालण्यात आली आहे. त्यामुळे खामगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे हस्तांतरण लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहेत. हस्तांतरण झाल्याशिवाय खासगी कंत्राटदार कंपनीस देखभाल दुरुस्तीचा कार्यादेश देणे पालिका प्रशासनास अशक्य आहे.

पालिकेला भुर्दंड!महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला धरणापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठय़ासाठी सुमारे अडीच कोटी रुपये, वीज वितरण कंपनीला वीज बिलापोटी ६0 लाख रुपये, टेलिफोन बिल, पाटबंधारे विभागाचा खर्च आणि वितरणाचा खर्च मिळून पालिकेला सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च येतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पाटबंधारे विभाग, भारत संचार निगम लिमिटेड आणि नगरपालिका प्रशासनाचा समावेश असून, पाणी पुरवठा योजनेचे खासगीकरण केल्यास पालिकेची वार्षिक दोन कोटी रुपयांची बचत होऊ शकते; मात्र पाणी पुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा तिढा सुटत नसल्याने पालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

शासन निर्णय होऊनही प्राधिकरणाचा खोडा!पाणी पुरवठा योजनेचे हस्तांतरण नगरपालिकेकडे करण्यात यावे, यासाठी ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रयत्नांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पाणी पुरवठा मंत्र्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यामध्ये पाणी पुरवठा योजनेचे हस्तांतरण पालिकेकडे करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तरीही प्राधिकरणाकडून विविध अटी, शर्ती लादून या प्रक्रियेत खोडा घातला जात आहे. हा तिढा सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा लक्ष घालण्याची मागणी पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावMuncipal Corporationनगर पालिका