शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेचा रखडलेला अर्थसंकल्प होणार सादर!

By admin | Updated: March 9, 2016 02:34 IST

विशेष सभेविना सादर होणार नगरपालिकेचा अर्थसंकल्प

खामगाव : खामगाव नगरपालिकेचा रखडलेला अर्थसंकल्प लवकरच सादर होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी ११0 कोटीचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून, तो त्यांच्या माहितीस्तव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तथापि अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार हा नगराध्यक्षांचा असल्याने अर्थसंकल्प संदर्भातील प्रशासकीय हालचालीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. खामगाव नगरपालिकेचा अर्थसंकल्प ११0 कोटींचा असून, तो ६ कोटी शिलकीचा असल्याची विश्‍वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सर्वसाधारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जातो; मात्र खामगाव पालिकेत नगराध्यक्ष एका कथित अपहार प्रकरणात अडकल्यामुळे ते बाहेरगावी आहेत. त्यामुळे नगर पालिकेत अर्थसंकल्प मंजूर करण्यासंदर्भातील विशेष सभा बोलाविण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्या पृष्ठभूमीवर नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पर्यायी उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करून प्रभारी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांकडे माहितीस्तव तसेच पुढील प्रक्रियेसाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे.