शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

खामगाव बाजार समिती सभापती, सचिव अटकेत

By admin | Updated: May 7, 2017 02:23 IST

इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदीत घोटाळा; उपसभापती, संचालकांसह सहा जणांवर गुन्हे.

खामगाव (जि. बुलडाणा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदीत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाल्यावरुन सभापती, उपसभापती, सचिवासह ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान सभापती व सचिव यांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार झाले आहेत.राज्याचे पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या १९ मार्च २0११ च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी निविदा किंवा दरपत्रक बोलावून नामांकीत कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खामगाव बाजार समितीच्यावतीने वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन नोव्हेंबर २0१६ मध्ये नामांकीत कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात आले; मात्र यामध्ये सर्वात कमी दराचे दरपत्रक सादर करणार्‍या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदी करण्याचे प्रावधान असताना बाजार समितीकडून प्रो. प्रा.महालक्ष्मी सेल्स यांचे ज्यादा दराचे दरपत्रक मंजूर करण्यात आले. बाजारात ७000 रुपये प्रतिनग या दराने उपलब्ध असलेले वजनकाटे बाजार समितीने तब्बल १४,४५0 रुपये प्रतिनग दराने खरेदी केले. एकूण १00 वजनकाट्यांची खरेदी करण्यात आली. यामध्ये पुरवठा होण्याआधीच ५0 टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्यात आली. विशेष म्हणजे महालक्ष्मी सेल्स हे कंपनीचे अधिकृत विक्रेते नसल्याचे व त्यांनी दिलेला पत्ता बनावट असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे संचालक प्रकाश टिकार व अशोक हटकर यांनी ३ जानेवारी २0१७ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली होती. चौकशीत वरील सर्व गैरप्रकार उघडकीस आले. यामुळे खामगाव येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक महेश कृ पलानी यांनी शनिवार ६ मे रोजी खामगाव शहर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिली. यावरुन शहर पोलिसांनी सभापती संतोष टाले, उपसभापती निलेश दिपके, संचालक विलास इंगळे, प्रमोद चिंचोळकर, सचिव दिलीप देशमुख व महालक्ष्मी सेल्स तर्फे प्रोप्रायटर रा. मोरगाव दिग्रस ता. शेगाव यांच्याविरुध्द भादंवि कलम १२0 ब , ४0६, ४२0, ४६५, ४६८, ४७१, ४७७ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सभापती टाले व सचिव देशमुख यांना अटक केली असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.