शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सव : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:19 IST

खामगाव  : शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी खामगाव येथे चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३0 वाजता होत आहे. 

ठळक मुद्देखामगाव येथे शनिवार, १७ फेब्रुवारीपासून कृषी महोत्सवाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव  : शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी खामगाव येथे चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३0 वाजता होत आहे.  या उद्घाटन सोहळ्यास कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे, आ. अँड. आकाश फुंडकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान, नवे वाण, नवे प्रयोग यांची माहिती शेतकर्‍यापर्यंत पोहचवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या मालिकेतील पहिला महोत्सव खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. १६ ते २0 फेब्रुवारीदरम्यान होणारा हा कृषी महोत्सव पश्‍चिम विदर्भातील सर्वात मोठा असून, चारशे दालने उभारण्यात आली आहेत. यामध्ये शेतीविषयक माहिती, तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, सेंद्रिय शेती, सौर शेती कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रिया उद्योग व पशुपालन यासह अत्याधुनिक प्रात्यक्षिकांद्वारे शेतकर्‍यांना माहिती देण्यात येईल. या कृषी महोत्सवाला शेतकर्‍यांनी मोठय़ा संख्येने भेट देऊन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन ना. भाऊसाहेब फुंडकर, आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 

बैलगाडी दिंडीने वेधले लक्ष!कृषी महोत्सवाच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी येथे बैलगाडी दिंडी काढण्यात आली. या बैलगाडी दिंडीला राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी या दिंडीचे नेतृत्व केले. बैलगाडी दिंडी निघण्यापूर्वी सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या रॅलीत शेकडो शेतकरी बांधव बैलगाडीसह व ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. ही बैलगाडी दिंडी आकर्षण ठरली.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर