शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सव : शेतकर्‍यांना पडली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची भुरळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:02 IST

खामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 

ठळक मुद्देविविध स्टॉलवर बघण्यासाठी जिल्हय़ातील ग्रामीण भागातून झाली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. कृषी महोत्सवात प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र प्रात्यक्षिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकरी बचत गटाच्या सदस्यांनी प्रक्रिया यंत्राची माहिती उत्सुकतेने जाणून घेताना दिसत आहेत. फलोत्पादन शेतीकडे बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांचा सर्वाधिक कल दिसून आला.  या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली बी रहित मोसंबी, लिंबू, विविध प्रकारचा भाजीपाला पिके आदींची माहिती शेतकरी घेत आहेत. सौर ऊर्जेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव मोठी गर्दी करीत आहेत. संरक्षित शेतीच येत्या काळात तारणार असल्याने, शेतकर्‍यांचा त्याकडेही ओढा असल्याचे दिसून येत आहे. तसेच हवामान बदल व पावसाची अनिश्‍चितता पाहता, शेतकरी त्रस्त आहे. त्या दृष्टिकोनातून कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले आहे. पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातीवंत गायी, म्हैशी, शेळय़ांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकर्‍यांनी वळावे आणि शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. यासाठी या ठिकाणी शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे, तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स्य व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे.  कीटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवर येणारी कीड व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधीची विस्तृत माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान पाहता,  कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती उपलब्ध केली आहे. संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून तंत्रशुद्ध माहिती या ठिकाणी शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले बचतगटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला शेतमाल, खाद्यपदार्थ शेतकरी व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.  

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव