शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान दोन गटात हाणामारी; वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:19 IST

खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय  कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२  वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी  रात्री  १  वाजता दरम्यान घडली.

ठळक मुद्देस्थानिक तानाजी व्यायाम शाळेच्यावतीने राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बुधवारी रात्री अंतिम सामना सुरू असताना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नारेबाजी झाली. या नारेबाजीवरून एकाच समुदायातील दोन गट समोरा-समोर आले.

खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय  कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२  वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी  रात्री  १  वाजता दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत या भागात सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला आहे. स्थानिक तानाजी व्यायाम शाळेच्यावतीने राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बुधवारी रात्री अंतिम सामना सुरू असताना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नारेबाजी झाली. या नारेबाजीवरून एकाच समुदायातील दोन गट समोरा-समोर आले. यावेळी वादावादी झाल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. यात २५-३० दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, दगडफेकीत  बजरंग दलाचे अमोल अंधारे यांच्यासह  सौ. सुचेत्रा रवी तिवारी जखमी झाले आहेत. 

अंतिम सामन्यात गोंधळसमर्थ कब्बडी संघ आणि सती फैलातील हनुमान संघामध्ये अंतिम सामना सुरू होता. दरम्यान, नारेबाजीवरून खामगावातील सती फैलातील हनुमान मंडळ, शिवाजी नगरातील तानाजी मंडळ समोरा-समोर आले. या वादातून तुफान दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात गुरुवारी दुपारी १ वाजेपर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावKabaddiकबड्डी