शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
4
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
5
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
7
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
8
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
11
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
12
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
13
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
14
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
15
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
17
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
18
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
19
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
20
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका

खामगाव-जालना मार्ग ‘पीपीपी’द्वारे!

By admin | Updated: October 16, 2016 02:27 IST

खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा घेतला आढावा.

बुलडाणा, दि. १५- खामगाव - जालना रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, हा मार्ग खासगी विकासक भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) द्वारे उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. केंद्रीय योजनांचा समावेश असलेल्या दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमूलकर व चैनसुख संचेती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, मेहकर पंचायत समितीचे सभापती सागर पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.यावेळी आढावा घेताना खासदार म्हणाले, केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून विकासाचा सामाजिक समतोल साधत काम करत आहे. या संपूर्णपणे केंद्राच्या अखत्यारित असणार्‍या व केंद्र पुरस्कृत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविल्या पाहिजे. या योजनांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तीचा विकास करणे शक्य आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांंंगीण विकास करणे शक्य होईल. त्यामुळे केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतापराप जाधव यांनी यावेळी केल्या. मनरेगामध्ये कुशल व अकुशल कामांवरचा खर्च पूर्ण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे नियमानुसार कामांच्या टक्केवारीनुसार सहभाग बघून कामे घ्यावीत. कुशल कामांचे थकलेले देयके पूर्णपणे त्वरित अदा करावे. मनरेगामध्ये पशुसंवर्धन, मृद व जलसंधारण, फळबाग लागवड आदींसह विविध यंत्रणांची नियमात बसत असलेली कामे घ्यावीत. मागील काळात मंजूर असलेल्या लोणार तालुक्यातील मनरेगाच्या विहिरी पात्र आहेत; मात्र पूर्ण झाल्या नाहीत. अशा विहिरी त्वरित पूर्ण कराव्यात. जेणेकरून त्या भागातील शेतकर्‍यांना विहिरींच्या माध्यमातून सिंचनाचा लाभ होईल. ते पुढे म्हणाले, की प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत या वर्षी विमा भरलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांच्या नियुक्त समितीने पीक विमा भरलेल्या व नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना विमा कंपनी, कृषी विभाग किंवा बँक यांच्याकडे अर्ज करायला लावावा. तसेच अर्ज प्राप्त शेतकर्‍यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना मदत मिळवून द्यावी. शेतकर्‍यांनी नुकसान झाले असल्यास कृषी विभाग, ग्रामसेवक, बँक प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. घरकुल योजनेसंदर्भात बोगस लाभार्थी असल्याबाबत त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ८६ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी १४ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी विविध विभागप्रमुखांनी आपल्या खात्याच्या योजनेविषयी माहिती दिली. आमदारांनी विविध समस्या मांडल्या. बैठकीला लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे विभागप्रमुख, रेल्वेचे अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचलन चंद्रशेखर जोशी यांनी, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी मानले.