शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:27 IST

गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

  खामगाव: खामगाव तालुक्यात काही भागात रविवारी दुपारी झालेल्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात गारा सुद्धा पडल्या. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील काही भागात अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडवून दिली. बहुतांश शिवारातील गव्हाचे पिक आडवे झाले आहे. तालुक्याच्या बहुतांश भागात रविवारी दुपारी चार सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. तासभर कमी- अधिक प्रमाणात हा पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होता. वादळी वाºयामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे पीक फडातच आडवे झाले आहे.बारीक होण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील अंत्रज, आंबेटाकळी, बोरी अडगाव, बोथाकाजी, शहापूर, कंचनपुर,अटाळी उमरा,आवार पेडका,विहिगाव, आसा, दुधा आदी भागांत हा अवकाळी पाऊस झाला. गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या पिकाचेच मोठे नुकसान झाले आहे.  अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना अद्याप शासकीय पातळीवरून पुर्णत: मदत मिळाली नाही. खरिप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासकिय पातळीनंतर मदतीची घोषणा झाली. परंतु, शेतकरी त्यातुन आजूनही सावरला नाही. सोयाबीन, कापूस, उडिद, मूग या नगदी पिकांचे नुकसान झाले. खरीप पिकाने धोका दिल्यानंतर शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. अनेक भागातील शेतकºयांनी हरभरा, गहू, कांदा, मका,या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून  वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे. हुडहुडी भरणाºया वातावरणामुळे वेगवेगळ्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पिकांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव