शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:58 IST

घंटागाड्यांची सेवा मिळत नसल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव पालिकेला मिळालेल्या घंटागाड्या तीन महिन्यापासून एकाच जागेवर उभ्या आहेत. घंटागाड्यांची सेवा मिळत नसल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी शासनाने घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात कचरा संकलनासाठी जीपीएस प्रणालीवर आधारीत घंटागाड्या उपलब्ध करून दिल्यात. सध्या घंटागाड्या पालिकेच्या आवारात शोभेच्या वस्तू बनल्या असल्याचे दिसून येते. त्यावर जीपीएस यंत्रणा कार्यान्वीत करून तत्काळ या घंटागाड्यांचा उपयोग कचरा संकलनासाठी करावा असे अपेक्षीत होते. मात्र आजरोजी तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी घंटागाड्यांची सेवा सुरु होवू शकली नाही. यामुळे नागरिकामध्ये पालिका प्रशासनाविषयी संताप व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. अनेक वार्डात तर फक्त मुख्य रस्त्यावरील कचरा उचलला जात आहे. मात्र गल्लीमध्ये साचलेल्या कचºयाच्या ढीगाकडे ढूंकूनही पाहिले जात नसल्याचे दिसून येते. खामगाव पालिकेमध्ये विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांचीच कमिशनवर अनेकदा जुंपल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकाराने मुख्याधिकाºयांना सुद्धा काम करण्यास अडचण जात असल्याची माहिती आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाने याबाबीची दखल घेवून स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून पालिकेच्या अधिकाºयांचे कानटोचण्याची गरज व्यक होत आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला हरताळस्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत शहरात जमा होणाºया कचरा संकलीत करून त्यावर प्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठीच घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र नगर पालिका प्रशासनाच्या उदासिनतेने आजरोजी घंटागाड्यांचा उपक्रम खोळंबला असल्याचे दिसून येते. शासनाच्याच स्वच्छ महाराष्ट्र अभियानालाच एकप्रकारे पालिकेने हरताळ फासल्याचे दिसून येते.पालिकेने ई निविदा मागितल्या होत्या. मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घंटागाड्या सुरु करण्यात अडचण जात आहे. नविन निविदा मागितल्या आहेत. पुढील महिन्यात घंटागाड्यांची सेवा नागरिकांना मिळू शकेल.- धनंजय बोरीकर,मुख्याधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा