शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खामगांव: विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा करुण अंत, दोघे गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:01 IST

खामगांव:  विजेच्या धक्क्याने पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 11 आॅगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजता खामगांव शहरापासुन जवळच असलेल्या सुटाळा खुर्द परिसरात घडली. 

ठळक मुद्देसुभाष महादेव कळसकार विद्युत मिटरच्या अर्थिंग ताराला त्यांचा स्पर्श झाला. त्यांचे वडील महादेव दशरथ कळसकार हे त्यांच्या मदतीला आले व त्यांनी सुभाष यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात नेण्यात आले असता वाटेतच महादेव दशरथ कळसकार व सुभाष महादेव कळसकार दोघा पिता-पुत्रांचा करुण अंत झाला.

 

खामगांव:  विजेच्या धक्क्याने पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 11 आॅगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजता खामगांव शहरापासुन जवळच असलेल्या सुटाळा खुर्द परिसरात घडली. सुटाळा खु. येथे राहणारे सुभाष महादेव कळसकार वय 40 हे सकाळी 5.30 वाजता शौचालयावरुन परत आल्यानंतर  घरातील विद्युत मिटरच्या अर्थिंग ताराला त्यांचा स्पर्श झाला. अर्थिंग तारामध्ये जिवंत विद्युत प्रवाह असल्याने त्यांना जबरदस्त शाॅक बसला असता त्यांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून घरात असलेले त्यांचे वडील महादेव दशरथ कळसकार हे त्यांच्या मदतीला घरातुन बाहेर आले व त्यांनी सुभाष यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ही विद्युत शाॅक लागला. याचवेळी घरात झोपलेले विजय महादेव कळसकार व नितीन महादेव कळसकार यांनी आरडाओरड ऐकली. ते घरा बाहेर  आले असता त्यांना  आपले वडील व भाउ यांना विद्युत शाॅक लागल्याचे दिसले. या दोघांनी सुध्दा त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विद्युत प्रवाहाचा जोरदार शाॅक बसला. गावकरी व शेजा-यांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता वाटेतच महादेव दशरथ कळसकार वय 60 वर्षे व सुभाष महादेव कळसकार वय 40 या दोघा पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले विजय महादेव कळसकार वय 24 व नितीन महादेव कळसकार वय 26 या दोघांना उपचारार्थ सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे.  

माजी आमदार सानंदा यांच्याकडून सांत्वनघटनेची माहिती मिळताच माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सामान्य रुग्णालयामध्ये जाउन कळसकार कुटुंबियांचे सात्वंन केले व घटनेत जखमी झालेल्या विजय व नितीन कळसकार यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपुस केली. यावेळी त्यांच्या समवेत बब्बु चव्हाण, तुषार चंदेल, अन्सार भाई आदी उपस्थित होते.    या ह्दयद्रावक घटनेमुळे सुटाळा खुर्द गावात शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :khamgaonखामगावelectricityवीज