शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : घरकुलाच्या अर्जासाठी पैशांची मागणी; लाभार्थींच्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:28 IST

खामगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  तक्रारी प्राप्त झाल्यानंतर  पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात आल्याचे समजते.

ठळक मुद्देसर्वेक्षक पालिकेच्या रडारवर

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  तक्रारी प्राप्त झाल्यानंतर  पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात आल्याचे समजते. मुंबई येथील संस्थेची प्रकल्प विकास सल्लागार म्हणून नेमणूक  झाली असून, सर्वेक्षण आणि लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी सर्वेक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यापैकीच काहींकडून ही मागणी केली जात असल्याची तक्रार आहे.

६ हजार अर्जांचे वितरण!घरकुलासाठी शहरातील सहा हजाराच्यावर नागरिकांना अर्जांचे वितरण गेल्या महिनाभराच्या कालावधीत करण्यात आले आहेत. यापैकी साडेतीन हजार अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, अर्जासाठी सर्वेक्षकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पालिकेचे प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र!शहरातील विविध भागांचा सर्व्हे करून अर्ज भरून घेण्यासाठी  सर्वेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन संस्थेने ६५ सर्वेक्षक नेमले असून, या सर्वेक्षकांकडून लाभार्थ्यांना अर्जासाठी १00 ते १५0 रुपयांची मागणी केली जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे सर्वेक्षकांच्या नावानिशी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वेक्षक पालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून संबंधित प्रकल्प विकास संस्थेस पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात प्रकल्प विकास संस्थेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

लाभासाठी अर्ज नि:शुल्क  आहेत. अर्जासाठी कुणासही पैसे न देता, यासंदर्भातील तक्रारीसाठी थेट मुख्याधिकार्‍यांनी संपर्क साधावा.  या प्रकाराची चौकशी करण्यात येईल.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, खामगाव

 लाभार्थ्यांनी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. सर्वेक्षकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे.- शोभाताई रोहणकारबांधकाम सभापती, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगाव