शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: मुख्याधिकाऱ्यांचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून निरस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : येथील रॅलीज प्लॉट भागातील विनापरवानगी केलेले बांधकाम निष्कासित करण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी दिला. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील रॅलीज प्लॉट भागातील विनापरवानगी केलेले बांधकाम निष्कासित करण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी दिला. या आदेशानुसार पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक शुक्रवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले; मात्र तत्पूर्वीच बांधकाम मालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगनादेश मिळविला. त्यामुळे पालिकेच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. रॅलीज प्लॉट भागात इस्माईल हकीमोद्दीन बोहरा यांनी विनापरवानगी गोदामाचे बांधकाम केले. याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार झाली. त्यानंतर विना परवानगी बांधकाम निष्कासित करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी आदेश  दिला. त्यानुसार पालिकेचे पथक, जेसीबी आणि लवाजम्यासह घटनास्थळी पोहोचले; मात्र तत्पूर्वीच बांधकाम करणाऱ्या ईस्माईल हकीमोद्दीन बोहरा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा स्थगनादेश नगरपालिका पथकाला दाखविला. त्यानंतर पालिकेचे पथक घटनास्थळावरून रिकाम्या हाताने परतले.

अडीच तास ताटकळत होते पथक!  विना परवानगी बांधकाम पाडण्यासाठी तब्बल अडीच तास पथकाला ताटकळत बसावे लागले. पालिकेचे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच घटनास्थळी जेसीबी आणि मलबा उचलण्यासाठी ट्रॅक्टर पोहोचले होते.   त्यानंतर पथक प्रमुख अनुराग घिवे, पंकज काकड, आर. व्ही. देशमुख, सुभाष शेळके, अरुण चव्हाण, दीपक कदम, सुनील सोनोने, दुर्गासिंह ठाकूर, विक्की सारसार, विमल सारसर, अर्जन छापरवाल घटनास्थळी पोहोचले होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव