खामगाव : महिला बचत गटाच्या मेळाव्यात स्टॉल उभारणीचा घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:58 PM2019-09-15T13:58:23+5:302019-09-15T13:58:28+5:30

नियोजनाअभावी फसलेल्या मेळाव्यात स्टॉल उभारणीत घोळ झाल्याची जोरदार चर्चा आहे.

Khamgaon: Chaos in Stall set up of Women self help Groups | खामगाव : महिला बचत गटाच्या मेळाव्यात स्टॉल उभारणीचा घोळ!

खामगाव : महिला बचत गटाच्या मेळाव्यात स्टॉल उभारणीचा घोळ!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथे गत आठवड्यात पार पडलेल्या महिला बचत गटाच्या मेळाव्याचे ‘कवित्व’ संपता संपत नसल्याचे दिसून येते. नियोजनाअभावी फसलेल्या मेळाव्यात स्टॉल उभारणीत घोळ झाल्याची जोरदार चर्चा आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेपेक्षा कमी स्टॉलची उभारणी करण्यात आल्यानंतरही २५० स्टॉलचे देयक मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे सा.बा. विभागातील अंदाजपत्राकावरून दिसून येते.
बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गत आठवड्यात खामगाव येथे बचत गटांतील महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला. स्थानिक आमदार निधीतून या मेळाव्याचे आयोजन केले गेले. यासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून खामगाव पालिकेला जिल्हा नियोजन समितीने अधिकार दिले. सोबतच जिल्हा परिषद प्रशासनानेही या मेळाव्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र, मेळाव्या आयोजनाचे टायमिंग आणि नियोजन चुकल्याने शासकीय निधीचा मोठ्याप्रमाणात अपव्यय झाला. दरम्यान, या मेळाव्याच्या माध्यमातून मलिदा लाटण्यासाठी सक्रीय असलेल्यांनी आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणत, देयक काढण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. सत्ताधारी गटातील काही जणांकडून अधिकाऱ्यांना दमदाटी आणि धमकाविल्या जात असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.


बचत गटातील महिलांच्या तक्रारी!
बचत गटातील महिलांना कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याच्या तक्रारी या मेळाव्या दरम्यान, अनेक महिलांनी केल्या. जळगाव जामोद, मेहकर, पाडळी शिंदे येथील महिलांनी आपल्या कार्यकाळातील सर्वात अपयशी असलेला हा मेळावा असल्याच्या तक्रारी माध्यमांसमोर केल्या होत्या.

मान्यतेपेक्षा कमी स्टॉलची उभारणी !संघर्ष!
खामगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित मेळाव्यात २५० स्टॉलच्या उभारणीसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. यासंदर्भातील अंदाजपत्रकही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी अवघ्या १३५ स्टॉलची उभारणी करण्यात आली. वस्तुस्थितीत ४ सप्टेंबर पर्यंत केवळ ७३ स्टॉलचीच नोंदणी येथे झाली. त्यातही वॉटर प्रुफ स्टॉल न उभारण्यात आल्याने पहिल्याच दिवशी अनेक बचत गटांच्या महिलांनी या मेळाव्यातून काढता पाय घेतला. या मेळाव्याच्या नियोजनाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.


सहकार्यासाठी अधिकाºयांना दमदाटी!
महिला बचत गटाचे नियोजन फसल्यानंतर सादर करण्यात आलेल्या २५० स्टॉलचे देयक काढण्यासाठी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित यंत्रणांवर दबाव आणल्या जात आहे. वस्तुस्थितीचे बिंग फोडणाºया पालिकेतील एका अधिकाºयांविरोधात सत्ताधाºयांकडून अशोभनिय वर्तणूक करण्यात आली. त्यामुळे महिला बचत गटाचा मेळावा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खामगावात महिला बचत गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला. सणासुदीच्या दिवसांत या मेळाव्याला प्रतिसाद कमी मिळू शकतो. मात्र, हा मेळावा अयशस्वी झाला, असे म्हणता येणार नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.
- अनिता डवरे
नगराध्यक्षा, खामगाव.


खामगाव येथे आयोजित ्रमेळाव्यासाठी ५५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही बचत गटातील महिलांना कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या मेळाव्याच्या आयोजनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, या मेळाव्यासंबधीत निविदा आणि देयकं प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी.
- सरस्वती खासणे
माजी नगराध्यक्षा, खामगाव.

Web Title: Khamgaon: Chaos in Stall set up of Women self help Groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.