शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : ब्लॅकस्टोन लॉजिस्टिकने भरला २८ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:22 IST

ब्लॅकस्टोन लॉजिस्टिकने भरला २८ हजाराचा दंड

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या गोदामावरील  इलेक्ट्रानिक्स काट्यात दोष निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा केल्याची कबुली  ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.ने दिली. त्यामुळे भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाने संबंधितांना सदर प्रकरणी( प्रकरण कम्पाऊंड केले) दंड आकारला आहे. या दंडाच्या रक्कमेचा भरणा संबधितांना ई-चालान पध्दतीने भरण्यात आला आहे. दरम्यान, प्रकरणी कुठेतरी पाणी मुरल्यानेच संबंधितांवर सौम्य प्रकारची कारवाई झाल्याची खमंग चर्चा आहे.भारतीय खाद्य निगमने खामगाव येथे करारबध्द केलेल्या ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा. लि. व्यवस्थापनाने वे-ब्रिजवरील इलेक्ट्रॉनिक्स काट्याचे इंडिकेटर वैद्यमापन शास्त्र विभागाला माहिती न देता बदलविल्याचे धक्कादायक प्रकरण २९ एप्रिल २०२० रोजी उघडकीस आले. याप्रकरणी  भारतीय वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाचे निरिक्षक प्रदीप शेरकार यांनी २९ एप्रिल रोजी एफसीआयच्या गोदामावरील इलेक्ट्रानिक्स काटा जप्त केला. त्यानंतर भारतीय वैद्य मापन शास्त्र विभागाने संचालक सागर नंदकुमार भाटेवरा, रा. नागपूर, ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि. टेंभूर्णा फाटा यांच्या विरोधात भारतीय वैद्यमापन शास्त्र विभाग कायदा २००९ आणि नियम २०११ अन्यवे कलम  ८ (३),  नियम १८(३) आणि कलम २५, नियम २३ अन्वये कारवाई करण्यात आली. काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हाची कबुली दिली. वैद्यमापन शास्त्र विभागाने लावलेला दंड भरण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे हे प्रकरण कम्पाऊंड करण्यात आले.गोदामावरील काट्याचे प्रमाणीकरण!टेंभूर्णा ता. खामगाव येथील गोदामावर काट्यावर दोष निर्माण केल्यानंतर भारतीय वैद्यमापन शास्त्र विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांनी २८००० रुपये दंडाचा भरणा केल्यानंतर शुक्रवारी दुपारी येथे भारतीय वैद्यमापन शास्त्र निरिक्षक प्रदीप शेरकार यांनी आपल्या पथकासह काट्याचे प्रमाणीकरण केले. वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाचे सहा. नियंत्रक एन.आर. कांबळे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

कोट...काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक प्रा.लि.कडून दंडाचा भरणा करण्यात आला आहे. त्यानंतर गोदामावरील काट्याचे इंडिकेटर बदलल्यानंतर नव्याने प्रमाणीकरण करण्यात आले आहे.- प्रदीप शेरकारनिरिक्षक,भारतीय वैद्यमापन शास्त्र,खामगाव विभाग.

फोटो:---

टॅग्स :khamgaonखामगाव