शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : बँकांचे कर्ज माफ, सावकारांचे कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:49 IST

खामगाव : शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे बँकांच्या कर्जातून शेतकरी मुक्त झाले असले, तरी कित्येक शेतकर्‍यांच्या मानेभोवती  खासगी वैध-अवैध सावकारांचे ‘पाश’ कायमच असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देशेतकरी अद्याप कर्जबाजारीच खासगी सावकारांच्या पाशातून मुक्तीची शेतकर्‍यांना प्रतीक्षा

नितीन निमकर्डे।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे बँकांच्या कर्जातून शेतकरी मुक्त झाले असले, तरी कित्येक शेतकर्‍यांच्या मानेभोवती  खासगी वैध-अवैध सावकारांचे ‘पाश’ कायमच असल्याचे दिसून आले आहे.मागील चार-पाच वर्षांमध्ये दुष्काळी परिस्थिती व शेतमालाच्या भावातील घसरणीमुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे बँकांचे कर्ज थकले होते. नवीन कर्ज मिळण्यात अडचणी असल्याने गत दोन-तीन वर्षांत अनेक शेतकर्‍यांनी खासगी सावकारीचा सहारा घेतला. वैध, अवैध सावकारांकडून मिळेल त्या व्याजदराने कर्ज काढून शेतीची पेरणी केली; परंतु शेतकर्‍यांमागचे शुक्लकाष्ठ काही संपले नाही. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडल्याने शेतकरी कर्जमाफीची मागणी पुढे आली होती. याकरिता सत्ताधारी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षांनी रान माजविले होते. शेतकरीही रस्त्यावर उतरला. परिणामी, राज्य सरकारने  शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर केली. या ‘सरसकट’ कर्जमाफीत सावकारी कर्जाचा मात्र समावेश झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मानेभोवती सावकारी कर्जाचा पाश कायम राहिला असल्याचे दिसून येते. तीन-चार वर्षांपूर्वी सरकारने परवानाधारक सावकारांकडील कर्ज शेतकर्‍यांना माफ केले होते; परंतु त्यामधील काही जाचक अटींमुळे अनेक शेतकर्‍यांना त्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही. शिवाय, अनेक शेतकर्‍यांना नवीन सावकारी कर्ज घ्यावे लागले असून, सद्यस्थितीत तेही थकल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे.

शासनाने जून महिन्यात जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास बराच विलंब झाला. सध्याही ही प्रक्रिया सुरूच आहे. अद्याप कित्येक शेतकर्‍यांना कर्जमाफीबाबत संदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील खरीप व रब्बी हंगामात अनेक शेतकर्‍यांना बँकेचे कर्ज मिळू न शकल्याने त्यांना सावकारांचा उंबरठा ओलांडावा लागला.

जास्तीच्या व्याजदराने मोडले कंबरडेखासगी सावकारीचा व्यवसाय करणारे अनेक जण परवानाधारक असले तरी ते प्रत्यक्षात कर्ज वाटप करताना अव्वाच्या सव्वा व्याजदराची आकारणी गैरकायदेशीररीत्या करीत असल्याचे दिसून येते. दरमहा ५ ते १0 शेकडा दराने व्याजाची आकारणी करणारे अनेक सावकार आहेत. त्यामुळे नाइलाजाने खासगी सावकाराचा उंबरठा ओलांडणारा शेतकरी व्याजाच्या दुष्टचक्रात अडकतो. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी हे कर्जसुद्धा माफ होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :khamgaonखामगाव