खामगाव : ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहर व परिसरातील तापमानाचा पारा गेल्या तीन ते चार दिवसांपासून ४५ अंश सेल्सिअसचे वरच राहत आहे. एकूणच उष्णतेच्या या वाढत्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाढत्या उष्णतामानापासून बचावासाठी काळजी घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे. विकएन्ड नंतर उजाडणारा सोमवारी शहरात गजबजलेले वातावरण असते. मात्र सुटी नसतांनाही शहरात गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. शहरातील गल्लीबोळातही दुपारचेवेळी संचारबंदीसदृश स्थिती असते. शहरात दरवर्षी तापमानवाढीमुळे मे महिना हिट ठरत असतो. मात्र यावर्षी शहरातील तापमान मार्चच्या पंधरवड्यापासूनच वाढण्यास सुरुवात झाली असून एप्रिल महिन्यात आलेल्या या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे.
खामगाव @ ४५
By admin | Updated: April 19, 2017 00:49 IST