शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: निवारागृहात अडकलेल्या ३६ जणांची  स्वगृही रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:20 IST

खामगाव येथील निवारागृहात अडकलेल्या ३६ जणांची  स्वगृही रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयामध्ये वाशीम जिल्ह्यातील  २७ तर यवतमाळ जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. आता निवारागृहात परराज्यातील ७१ जण अडकले आहेत. निवारागृहातील प्रत्येकाचे समुपदेशन करण्यात येत होते.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: कोरोना विषाणू संक्रमणामुळे अचानक लागलेल्या संचारबंदीत खामगाव येथील निवारागृहात अडकलेल्या ३६ जणांची  स्वगृही रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आता निवारागृहात परराज्यातील ७१ जण अडकले आहेत.कोरोना विषाणू संक्रमन रोखण्यासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीचे आवाहन केले. त्यानंतर दुसºया दिवशी संपूर्ण देशात ‘लॉकडाउन’सुरू झाले. या कालावधीत रोजगार आणि प्रवासासाठी बाहेर असलेले अनेक जण विविध ठिकाणी अडकले. यापैकी काही घरी जाण्यासाठी विविध प्रवासांच्या साधनांसह गावाकडे पायी प्रवास सुरू केला. अशांना पोलिस आणि प्रशासनाकडून स्थानबद्ध करण्यात आले. खामगावात स्थानबध्द करण्यात आलेल्यांना घाटपुरी रोडवरील शासकीय वसतीगृहातील निवारा गृहात ठेवण्यात आले. दरम्यान, निवारागृहातील महाराष्ट्रातील मजुरांना सोडण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झाले. त्यानंतर निवारागृहात २१ पेक्षा जास्त दिवस झालेल्या ३६ जणांची खामगाव येथील निवारागृहातून स्वगृही रवानगी करण्यात आली. यामध्ये वाशीम जिल्ह्यातील  २७ तर यवतमाळ जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे.  दरम्यान, परराज्यातील ७१ जणांबाबत  अद्यापपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्यांने त्यांना निवारागृहातच ठेवण्यात आले आहे.

वैद्यकीय तपासणीनंतर सोडले !खामगाव येथील शासकीय वस्तीगृहातील निवारा गृहात  कोरोना संचारबंदी दरम्यान अडकलेल्या १०७ जणांना ठेवण्यात आले. यापैकी महाराष्ट्र राज्यातील ३६ जणांना राज्य शासनाच्या परवानगीने सोडण्यात आले आहे.

निवारागृहात अनेकांचे २१ पेक्षा जास्त दिवस पूर्ण!कोरोना संचारबंदी लागू झाल्यानंतर रस्त्याने पायी जाणाºया तसेच विविध वाहनाने प्रवास करणाºयांना टप्प्याने घाटपुरी येथील निवारागृहात दाखल केले होते. येथे त्यांच्या निवाºयासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. निवारागृहातील प्रत्येकाचे समुपदेशन करण्यात येत होते.

खामगाव येथील निवारा गृहातील ३६ जणांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून सोडण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाले होते. निवारागृहातून सोडण्यात आलेल्यांमध्ये वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील कामगार तसेच नागरिकांचा समावेश आहे.- डॉ.शीतलकुमार रसाळतहसीलदार, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या