शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

खामगावात रमजान ईद उत्साहात

By admin | Updated: July 29, 2014 23:45 IST

सुख व शांतीसाठी मुस्लिम बांधवांनी मागितली दुवा

खामगाव : शहरातील मुस्लीम बांधबांनी मोठय़ा उत्साहात ईद साजरी केली. सकाळी १0 वाजता परिसरातील सजनपुरी येथील ईदगाहवर ईद उल फितर ची नमाज पडण्यात आली. या आधी शहरातील विविध मस्जिदमध्ये ही नमाज पडण्यात आली. मुस्लिम समुदायाचा सगळ्य़ात महत्वाचा सण म्हणून ईदकडे पाहिले जाते. पवित्र रमजान महिन्यानंतर ईद साजरी करण्यात येते. आज २९ जुलै रोजी इद साजरी करण्यात आली. रात्री पासूनच मुस्लीम बांधव ईदच्या तयारीला लागले होते. सकाळी ईद चे गुसल स्नान केल्यानंतर नमाज पडण्यात आली व या यानंतर सर्व मुस्लीम बांधव नवे कपडे घालून सामूहीक नमाद अदा करण्यासाठी ईदगाह येथे एकत्र आले. ईदगाहवर जाण्याअगोदर कच्छीयान मस्जिद, हरीफैेल मस्जिद, कालनी मस्जिद व शहरातील अन्य मस्जिदमध्ये ईदची नमाज पडण्यात आली. ईजची नमाज फाटकपुरा मस्जिद चे इमाम हाफिज सरफराज खान यांनी पठण केली. ९.४५ वाजता इमाम हाफिज सरफराज खान यांनी नमाज पठण करण्याची शास्त्रोक्त माहिती दिली. सकाळी ठिक १0 वाजता नमाज सुरु झाली. नमाज पठन झाल्यानंतर इमाम हाफिज सरफराज खान यांनी खुतबा दिला आणि इस्लामच्या भलाईसाठी सुख, शांतीसाठी दुआ मागीतली. जगामध्ये सुख व शांती नांदावी यासाठी ही दुवा मागण्यात आली. दुवा झाल्यानंतर सगळ्या मुस्लीम बांधवांनी एक- दुसर्‍यांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह परिसरात लहान मुलांच्या खेळण्याच्या दुकांनावर साहित्य खरेदीसाठी मुलांनी गर्दी केली होती. अनेक मुस्लीम बांधव ईदगाहच्या नंतर कब्रस्थानमध्ये गेले व तेथे जाऊन आपल्या नातेवाईकांसाठीही दुवा मागितली. यानंतर एक दुसर्‍यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.