शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेतील रबरी ‘शिक्के’ कंत्राटदार भरोसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 14:24 IST

कर्मचाऱ्यांची कंत्राटदारांशी सलगी; दस्तवेजासह शिक्यांचा अनधिकृत वापर

खामगाव:  पालिकेत महत्वपूर्ण फायली सुरक्षीत नसतानाच, काही महत्वपूर्ण शिक्यांचा कंत्राटदारांकडून अनधिकृत वापर केल्या जातो. ही वस्तुस्थिती आता लपून राहीलेली नाही. कंत्राटदारांच्या या ‘मुजोरी’ला पालिकेतील काही कर्मचाºयांची ‘सलगी’ कारणीभूत ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला.

पालिकेतील नगररचना विभागातील लिपिकाच्या जागेवरबसून एक कंत्राटदार आपल्या जवळील फायलीवर शिक्के मारत होता. माहिती अधिकारासंबधीत फायलीवर कंत्राटदार स्वत:च शिक्के मारत असताना, नगर रचना विभागातील एकही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. लिपिक बाहेर तर, इतर कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या. असे चित्र बुधवारी दुपारी ११.३० वाजता पालिकेत दिसून आले. हा प्रकार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या नजरेतून सुटला नाही. संबधित कंत्राटदाराचे चित्रण आणि छायाचित्र घेण्यात आले. त्यामुळे पित्तखवळलेल्या कंत्राटदाराने माध्यम प्रतिनिधीचा मोबाईल हिसकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. फायलीवर स्वत:च शिक्के मारण्याचा प्रयत्न अंगलट येत असल्याचे पाहून, कंत्राटदाराने अर्धवट अवस्थेतील फाईल घेवून पालिकेतून पळ काढला. दरम्यान, पालिकेतील विविध विभागातील फायली गहाळ असल्याच्या वृत्तांचा धुराळा खाली बसत नाही, तोच पालिकेतील महत्वपूर्ण शिक्के आणि कार्यालयीन कामकाजाच्या इतर वस्तूंच्या सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाºयांशी असलेल्या सलगीमुळेच हा प्रकार घडला. या प्रकाराला संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचा पाठींबा असल्याचीही जोरदार चर्चा पालिका वर्तुळात बुधवारी दिवसभर होती. दरम्यान, कंत्राटदाराने आपण कार्यालयात नसल्याचा गैरफायदा घेत, शिक्के मिळविल्याचे स्पष्टीकरण नगर रचना विभागातील लिपिक अरुण चव्हाण यांनी नगराध्यक्षांना दिले. पालिकेतील गैर कायदेशीर प्रकारांना वेळीच आळा न घातल्यास, नजिकच्या काळात मुख्याधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंगावर हे प्रकार शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर नगर रचना विभागात काही कर्मचारी कंत्राटदारांना रात्री उशीरा घेवून बसतात. यावेळी अनेक गैर कायदेशीर कामे केली जात असल्याचा आरोप या निमित्ताने होत आहे.

नगराध्यक्षांकडून लिपिकाची कानउघडणी!पालिकेतील हा प्रकार नगराध्यक्षांपर्यंत पोहोचला. त्यानंतर नगराध्यक्षांनी संबंधित लिपिकाला आपल्या दालनात पाचारण केले. झालेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावेळी लिपिकाने घडलेल्या प्रकार सत्य असल्याची कबुली दिली. त्यामुळे नगराध्यक्षांनी या लिपिकाची चांगलीच कानउघडणी केली. असले प्रकार यापुढे खपवून घेतल्या जाणार नसल्याची तंबीही नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी संबंधितांना दिली.

पालिकेत कंत्राटदारांचे वर्चस्व!पालिकेतील नगर रचना आणि बांधकाम विभागातील लिपिक तसेच कर्मचारी सतत कंत्राटदारांच्या गराड्यात असतात. सर्वसामान्य नागरिकांना आल्या पावली परत पाठविणारे बांधकाम आणि नगर रचना विभागातील कर्मचारी या कंत्राटदारांची चांगलीच जी-हुजरी करीत असल्याचे पालिकेत अनेकदा दिसून येते.

कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी!संगणक विभागातील कर्मचाºयाला मंगळवारी कंत्राटदाराने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत संगणक विभागातील अजय गवळे नामक कर्मचाºयाने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली. त्याच शर्मा नामक कंत्राटदाराने बुधवारी नगर रचना विभागात स्वत:च फायलीवर शिक्के मारल्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी दुपारी कंत्राटदाराने स्वत:च शिक्के मारण्याचा प्रकार अतिशय चुकीचा आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याबाबत दक्षता घेतली जाईल.- एन. डी. जोशी, नगर अभियंता, नगर परिषद खामगाव.बुधवारी दुपारी बांधकाम, नगर रचना विभागात घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली जाईल. कार्यालयातील दस्तवेज आणि शिक्क्यांचा दुरूपयोग अतिशय गंभीर बाब आहे.- एल. जी. राठोड,  कार्यालयीन पर्यवेक्षक, नगर परिषद खामगाव.

सामान्य माणसांना वेठीस धरणाºया पालिका कर्मचाºयांकडून कंत्राटदारांचे हितसंबध जोपासले जात असतील, तर हा प्रकार अतियश किळसवाणा आहे. यापुढे  अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आपणाकडून स्वत: पुढाकार घेतला जाईल.- अनिता डवरे, नगराध्यक्षा, नगर परिषद खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावMuncipal Corporationनगर पालिका